टोकियो, 12 मार्च : नवरा (husband) आणि बायको (wife) एकमेकांसोबत असताना जितके एकमेकांसोबत भांडतात तितकेच दुरावल्यानंतर एकमेकांसाठी त्यांचा जीव तुटतो. पत्नी असो वा पती अर्धवट संसार सोडून जोडीदारानं कायमची साथ सोडली की ती व्यक्ती पूर्णपणे खचते. त्यातही त्या व्यक्तीची साधी शेवटचीही भेट झाली नसेल तर जीव कासावीस होतो आणि तिची काही इच्छा राहिली असेल तर मग ती पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होते. अशीच धडपड सुरू आहे ती जपानमध्ये (japan) एका व्यक्तीची. या व्यक्तीची बायको त्सुनामीमध्ये (tsunami) गायब झाली आणि गेल्या दहा वर्षांपासून तो भरसमुद्रात आपल्या बायकोचा (man searching wife in sea) शोध घेतो आहे. साल 2011… 700 किमी प्रति तास वेगानं 133 फूट उंचच उंच लाटांनी जपानचा उत्तर पूर्व किनारा हादरला. या त्सुनामीत कित्येक लोकांचा मृत्यू झाला आणि कित्येक जण गायब झाले, ज्यांचा अद्यापही पत्ता नाही लागला. त्यापैकीच एक म्हणजे 64 वर्षांचे यासुओ ताकामात्सु यांची पत्नी युको. हे वाचा - खतरनाक! धगधगत्या ज्वालामुखीवरून गेली करीना; VIDEO पाहून अंगावर येईल काटा त्सुनामी आला तेव्हा यासुओ यांना आपल्या पत्नीची चिंता नव्हती. कारण त्यांची पत्नी एका बँकेत काम करत होती. ही बँक एका डोंगराच्या पलिकडे होती. धोका पाहता बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यातही आलं होतं. पण तरी त्यांच्यापर्यंत सुनामी पोहोचली. यासुओ यांची पत्नी अद्यापही सापडली नाही. तेव्हापासून ते आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पत्नीला शोधण्यासाठी त्यांनी अंडरवॉटर डाइव्हिंगचं लायसेन्सही घेतलं आहे. गेल्या सात वर्षांपासून ते एकटेच समुद्रात आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. स्थानिक प्रशासनाशीदेखील ते संपर्कात आहेत. पत्नीशी संबंधित काहीतरी आपल्या हाती लागेल अशी आशा त्यांना आहे. आतापर्यंत पाण्यात त्यांना कपडे, अल्बम अशा अनेक वस्तू मिळाल्या. पण या सर्व वस्तू इतर व्यक्तींच्या आहेत. त्यांच्या पत्नीशी संबंधित एकही वस्तू सापडली नाही. हे वाचा - बॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं की… यासुको यांनी सांगितलं, त्यांची पत्नी बँकेत नोकरी करून थकली होती आणि तिला घरी यायचं होतं, हाच तिचा शेवटचा मेसेज होता. आजही आपल्या पत्नीला घरी यायचं असेल, असं त्यांना वाटतं. म्हणूनच ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला शोधत आहेत. आता आपलं संपूर्ण आयुष्य तिलाच शोधण्यात घालवण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.