नवी दिल्ली, 22 मार्च : आजच्या काळात बदलेलं लाईफस्टाईल (Lifestyle), वाढतं ऊन, धूळ, प्रदूषण यामुळे आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार ठेवणं फार कठीण झालेलं आहे. नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. कधी आजी-आजोबांनी दिलेल्या टिप्स फॉलो करतो तर कधी इंटरनेटवर सापडलेल्या ब्युटी हॅक्स करून पाहतो. आज आपण काही घरगुती स्किन केअर टिप्सविषयी (simple skin care tips) जाणून घेणार आहोत. त्वचेसाठी आपण घरात खावून उरलेली फळे वापरू शकतो, त्याचा चेहऱ्यावर खूप फायदा दिसून येतो. राहिलेली फळे अशी वापरा 1) पपई बाजारात उपलब्ध असलेल्या स्कीन प्रॉडक्टमध्येही पपईचा वापर करतात. चेहरा आणि बॉडी स्क्रबमध्ये पपई आढळते. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी पपई खूप फायदेशीर आहे. त्यात पॅपेन नावाचे एंजाइम असते, जे कॉस्मेटिक त्वचेच्या उपचारांमध्ये वापरले जाते. पपई खाऊन उरलेला भाग रोज चेहऱ्याला लावल्याने मुरुमे-डाग कमी होण्यास मदत होते. कसे वापरायचे घरात खाऊन उरलेली पपई मॅश करा आणि नंतर त्यात मध घालून त्वचेवर लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात साखर घालून स्क्रब म्हणून वापरू शकता. 2) लिंबू लिंबूमध्ये सर्वात शुद्ध व्हिटॅमिन सी असतं. त्यातील लिंबूवर्गीय गुणधर्म त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. लिंबाची साल/लगदा केसांना लावल्यास त्वचेचा कोंडा कमी होण्यास मदत होते. लिंबू जीवनसत्त्वे ए आणि बी देखील असतात. हे वाचा - मुलाला लहानपणीच शिकवा या गोष्टी; आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सहज जाईल सामोरं कसे वापरायचे उरलेले लिंबू डायरेक्स चेहऱ्यावर लावणे योग्य नाही. बेसन, दही यांसारख्या गोष्टींमध्ये मिसळून वापरा. जर तुमचे हाताचे कोपर गडद-काळपट झाले असतील तर तुम्ही त्यावर थेट वापरू शकता. यासाठी उरलेल्या लिंबामध्ये साखर घालून कोपरावर चोळा. 3) केळी केळीची साल काही वेळातच काळी होते आणि कुजते हे तुम्हाला माहीत आहे. पण तुमच्या त्वचेला सुंदर ग्लो देण्यासाठी ती खास उपयोगी पडू शकते. केळीच्या सालीमध्ये ए, बी आणि ई जीवनसत्त्वे असतात, जी त्वचेसाठी चांगली असतात. हे वाचा - कडाक्याच्या उन्हाळ्यातही रहाल एकमद फिट आणि हेल्दी; फक्त या गोष्टी जपा कसे वापरायचे केळीची साल लावण्यासाठी ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा. त्याची पेस्ट बनवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. ती सुकल्यावर चेहऱ्यावरून काढून टाका. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)