आपल्याला कोणीही कामापुरतं महत्त्व देतं आणि त्यानंतर आपल्या भावनांचा विचार करत नाही, असं लक्षात आल्यानंतर सर्वांनाच त्रास होतो. घरच्या लोकांकडूनही हे होत असतं. अनेकदा लोक आपल्याला गृहीत धरत असल्यामुळे हे होतं. कारण त्यांच्या कोणत्याही वेळेला आपण त्यांच्यासाठी available राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यामुळे आपलीच किंमत कमी होते. तुम्हालाही असंच काही वाटत असेल तर, सर्वप्रथम तुमच्या स्वभावात काही बदल घडवून आणा.
नवी दिल्ली, 08 मार्च : महिलांना (Women life) इम्प्रेस करणं फार कठीण काम नसलं तरी त्यासाठी थोडी मेहनत तर घ्यावी लागतेच. जर एखाद्या पुरुषाने सर्व आघाड्यांवर यशस्वी होऊनही स्त्रीला प्रभावित केलं, तरी दीर्घकाळ स्त्रीची आवड म्हणून टिकून राहणं शक्य नाही. महिलांना पुरुषांच्या (Men lifestyle) अनेक सवयी आवडत नाहीत, ज्यामुळे दोघांचे नाते जास्त काळ कदाचित टिकत नाही किंवा त्या नात्याला असूनही काही अर्थ उरत नाही. जाणून घेऊया पुरुषांच्या अशा पाच सवयी ज्या महिलांना आवडत नाहीत. महिलांना जणू मशीन समजणं झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, पती-पत्नीच्या नातेसंबंधात स्त्रीला फक्त घरातील कामं करणारी महिला, म्हणजेच जणू मशीन म्हणून विचार करणं थांबवायला हवं. कारण असे अनेक लोक आहेत जे महिलांना केवळ कामाचे यंत्र मानतात, ज्यामुळे महिलांना त्या नात्याचा आनंद अजिबात मिळत नाही आणि यातून पुढे नैराश्येत जावून जोडीदाराशी वेगळे होण्याचा निर्णय घेतला जातो. सर्व जबाबदारी स्त्रीवर टाकू नका दुसरी गोष्ट म्हणजे घरातील सर्व जबाबदारी फक्त स्त्रीवर टाकण्याची चूक करू नका. कारण बहुतेक नाती याच गोष्टीमुळे बिघडतात. असे मानले जाते की घराची सर्व जबाबदारी स्त्रीवर टाकली तर ती त्या नात्यात एकटी पडू लागते. घरी उशीरा येणं आजच्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. अशा स्थितीत अनेक पुरुष घरी उशिरा पोहोचले तर महिलांना एक-दोनदा हरकत नाही, पण रोज असे होऊ लागले तर त्यांना ते आवडत नाही. हे वाचा - Almond oil: दोन थेंब बदाम तेल चेहऱ्यावर आणेल जबरदस्त ग्लो; फक्त असा करा वापर निष्काळजी जोडीदार दुसरीकडे, महिलांना त्यांचा जोडीदार निष्काळजी असलेला आवडत नाही. बरेच पुरुष खूप आळशी वागत असतात, झोपून उठल्यावर स्वत:चे अंथरुणदेखील काढत नाहीत. याशिवाय छोट्या छोट्या गोष्टींवरू चिडचिड करत राहणे. स्वयंपाकघरातील गोंधळ अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की स्त्रिया नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवतात, पण पुरुषांनी स्वयंपाकघरात इकडे तिकडे काही केलं की त्यांना राग येतो, कारण महिलांना त्यांनी नीट ठेवलेल्या स्वयंपाकघराची दुरवस्था केलेली आवडत नाही. हे वाचा - मध आणि आवळा एकत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं, जाणून घ्या फायदे महिलांना स्वच्छता आवडते याशिवाय महिलांना स्वच्छता खूप आवडते, परंतु बहुतेक पुरुष खोलीत साहित्य अस्ताव्यस्त करून टाकतात, जे महिलांना आवडत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)