JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'या' 7 वनस्पती घरी लावाच; अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास होईल मदत

'या' 7 वनस्पती घरी लावाच; अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास होईल मदत

बऱ्याचवेळा आपण आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी घरात विविध प्रकारची शोभेची रोपटी लावतो. मात्र तुम्हाला माहित आहे का? या वनस्पती फक्त तुमच्या घराची शोभा नाही वाढवत तर तुमच्या घरातील हवा शुद्धीकरणाच काम देखील करतात त्यामुळे अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मार्च : घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक जण घरात विविध प्रकारची शोभेची, सुगंधी फुलांची झाडं, रोपटी लावतात. काही वनस्पती केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर तुमच्या घरातील हवा शुद्धीकरणाचं काम देखील करतात. सध्याच्या काळात जागेच्या कमतरतेमुळे, लहान घरं असल्याने घरी लावलेल्या रोपट्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे ते लावणं अवघड होतं. मात्र अशा काही वनस्पती आहेत, ज्यांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश अगदी कमी प्रमाणात लागतो. त्या वनस्पतींना तुम्ही अगदी सहजपणे आपल्या घरात किंवा खोलीत वाढवू शकता. या रोपांमुळे खोलीत एक सकारात्मक उर्जा निर्माण होते, त्यामुळे तुमचा तणावदेखील मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसंच तुम्ही राहत असणाऱ्या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण जास्त असेल, तर या वनस्पती हवेतील रसायनं शोषून घेऊन हवा शुद्ध करतात.

बांबू प्लांट -

जर तुम्ही एखाद्या अपार्टमेंटसारख्या ठिकाणी रहात असाल ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश खूप कमी प्रमाणात येतो. अशा ठिकाणी तुम्ही बांबू प्लांट लावू शकता. हवेत ट्राईक्लोरेथिलीन आणि बेन्जिन मोठ्या प्रमाणात असतं. त्यांना फिल्टर करून हवेला शुद्ध करण्याचं काम बांबू पाम करतं. ही हानिकारक तत्वं फर्निचरद्वारे हवेत पसरत असतात. त्यांना वेळीच स्वच्छ करणं गरजेचं असतं. त्यामुळे बांबू पाम तुम्ही खोलीतील फर्निचर जवळ सुद्धा ठेऊ शकता.

स्नेक प्लांट -

जर तुम्ही सतत बाहेर जात असाल, तर हे रोपटं आवर्जून लावा. कारण या रोपट्याला जास्त काळजी घेण्याची गरज नसते. अनेक दिवस हे रोप विनापाण्याचं राहू शकतं. स्नेक प्लांट खोलीतील हवा शुध्द करण्यास मदत करतं.

ग्रीन स्पायडर प्लांट -

ग्रीन स्पायडर या रोपाला देखील पाणी खूप कमी प्रमाणात लागतं. ही वनस्पती रुममधीव हवा शुद्ध करते. या रोपाची पानं कोष्टीच्या जाळ्याप्रमाणे असतात. त्यामुळे त्याला ग्रीन स्पायडर म्हंटलं जातं.

वीपिंग फिग -

धुळीची अलर्जी असेल, तर हे रोपटं खोलीत नक्की लावा. कारण ही वनस्पती हवेतील धुळीचे कण शोषून घेते. या रोपाला सुंदर पांढऱ्या रंगाची फुलं असतात.

वॉर्नक ड्रेकेना -

जर तुम्ही जास्त प्रदूषण असणाऱ्या भागात राहत असाल, तर हे रोप आपल्या खोलीत लावा. कारण हे रोपं हवेतील प्रदूषण कमी करून हवा स्वच्छ, शुद्ध करण्यास मदत करतं. या रोपाला सूर्यप्रकाशाची गरज नसते, त्यामुळे घरी लावण्यासाठी हे एक उत्तम रोपं समजलं जातं.

(वाचा :  Health tips : थायरॉइडला दूर ठेवण्यासाठी या गोष्टी आवर्जून खा, नक्की दिसेल परिणाम )

ऑर्किड प्लांट -

ऑर्किड प्लांटला अतिशय सुंदर फुलं असतात. त्यामुळे खोलीतील सौंदर्य, तर वाढतंच शिवाय हवा शुद्ध होते. हवेत जाईलीन आणि टोल्यून नावाची दोन हानिकारक गोष्टी आढळतात. ऑर्किड हवेतून या रसायनांना शोषून घेतं आणि हवा शुद्धीकरण करतं.

पीस लिली -

हे रोपटं हवेतून ट्राईक्लेरोथीन आणि बेन्जिनला शोषून घेतं आणि हवा शुद्ध करतं. ज्यांना दमा आहे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो अशा लोकांनी तर हे रोप आवर्जून आपल्या खोलीत लावलं पाहिजे. कमी सूर्यप्रकाशामध्ये देखील हे रोपं जिवंत राहत. केमिकलसदृश्य रूम फ्रेशनरचा वापर करण्याऐवजी या वनस्पतीचा वापर तुम्ही आपल्या खोलीत करू शकता. त्यामुळे चांगला सुगंधही खोलीत राहू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या