JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / युरोपीय न्युक्लियर रिसर्च संस्थेमध्ये का विराजमान आहेत 'नटराज'?

युरोपीय न्युक्लियर रिसर्च संस्थेमध्ये का विराजमान आहेत 'नटराज'?

भारतीय संस्कृतीतील नटराजची (natraj) मूर्ती CERN मध्ये देखील आहे, यामागे नेमकं काय कारण याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेरिन, 21 ऑक्टोबर : युरोपियन न्युक्लियर रिसर्च संस्था CERN तशी जुनी असून तिथं अणूशास्त्रावर संशोधन केलं जातं. जगातील सर्वात क्लिष्ट उपकरणं इथं ठेवण्यात आलेली आहेत. यासह जगातील सर्वात मोठा आणि शक्तीशाली पार्टिकल अक्सलेटर लार्ज हॅड्रन कोलाइडर (LHC) देखील इथं ठेवण्यात आले आहे. मात्र विशेष बाब या विविध उपकरणांसोबत या ठिकाणी नटराजची 2 मीटरची मूर्तीही आहे. युरोपियन न्युक्लिअर रिसर्च सेंटर  परिसरात CERN परिसरात  मुख्य भवनाजवळ बिल्डिंग 39 आणि 40 च्या मध्यभागी आहे ही नटराजची मूर्ती आहे. इथं नटराजची मूर्ती का ठेवण्यात आली याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. काही म्हणतात की मूर्ती म्हणजे आनंद तांडवची मुद्रा असून ती अणूंच्या गतीप्रमाणे आहे, तर काहींनी या अणूंची रचना आणि मूर्ती यात साम्य असल्याचं म्हटलं आहे. ब्रह्मांडाची विज्ञानाधारित कल्पना आणि या मूर्तीतील शिल्पात समानता असल्याचंही काही जणांचा मत आहे. सोशल मीडियावर असे बरेच दावे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र यापैकी कोणताच दावा खरा नाही. खरं तर ही नटराजची मूर्ती भारत सरकारने CERN सोबत संबंध अधिक दृढ होण्यासाठी एक भेट म्हणून दिली होती. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू झालेली ही संस्था अत्यंत उत्कृष्टरित्या कार्यरत आहे आणि भारत त्याचा सदस्य देश आहे. CERN च्या वेबसाइटवर या मूर्तीबाबत दिलेल्या माहितीनुसार,  भारत  CERN चा एक सदस्य आहे. CERN  अनेक संस्कृतीसह चालणारी संस्था आहे. इथं 100 पेक्षा जास्त देश आणि 680 संस्थाच्या वैज्ञानिकांचं स्वागत करण्यात आलं आहे. CERN  मध्ये अशा अनेक कलाकृती आणि प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक नटराज शिवचीही प्रतिमा आहे. हे वाचा -  शास्त्रज्ञांना सापडल्या 13000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा; दडलाय मायलेकाचा इतिहास 18 जून 2004 साली CERN परिसरात स्थापन करण्यात आलेल्या नटराजाच्या मूर्तीसोबत जो फलक आहे त्यात प्रसिद्ध विद्वान कापरा यांनी आपल्या शब्दात लिहिलंय, “पूर्वीपासूनच भारतीय कलाकारांनी शंकराच्या नृत्याची चित्रं साकारली आहेत. ती अलौकिक नृत्याचे दर्शन घडवतात. याचे रूप भौतिकशास्त्र आणि धर्म एकच असल्याच्या मिथकाला मूर्त रूप देतात” हिंदू धर्मानुसार नटराजाचं रूप शक्ती आणि जीवनाचं प्रतीक आहे. अलौकिक नृत्य आधुनिक सब अटॉमिक पार्टिकल अभ्यासासोबत एक प्रतीक म्हणून समजलं जाईल, या उद्देशाने भारत सरकारने ही प्रतिमा भेट देण्यासाठी निवडली. मिथ्य आणि विज्ञान यांच्यातील एक प्रतीकात्मक नातं कायम करण्यासाठी भारताने CERNला ही भेट दिली आहे. हे वाचा -  कसं शक्य आहे? सहारा वाळवंटात आढळली 1.8 अब्ज झाडं, सॅटेलाइट PHOTO आले समोर नटराज प्रतिमा एका रिपोर्टनुसार नटराजची ही मूर्ती अंधश्रद्धा, जातिव्यवस्था, धार्मिक मान्यता आणि ज्योतिष आदींना विरोध करणाऱ्या एका नास्तिक कलाकाराने तयार केली आहे. तमिळनाडूतील राजन उर्फ ‘सिरपी’ यांनी ही मूर्ती बनवली आहे. मेणाच्या मॉडेलचा वापर करून मातीचा साचा बनवून त्यात पितळं टाकून ही मूर्ती घडवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या