मुंबई, 02 जून : कोणत्याही हंगामात संत्री भरपूर खाल्ली जातात. संत्री, संत्र्याचा ज्यूस सगळेच लोक अगदी आवडीने खातात. त्वचा चांगली ठेवण्यासाठीदेखील संत्र्याचा उपयोग केला जातो. त्वचेचे रक्षण करण्यासाठी संत्री अतिशय फायदेशीर आहे. त्वचेला नैसर्गिकरित्या फ्रेश-ग्लोईंग बनवण्यासाठी घरच्या-घरी संत्र्याच्या सालीचा साबण (Orange peel soap) देखील वापरून पाहू शकता. ऐकून आश्चर्य वाटलं असलं तरी हे शक्य (Skin care Tips) आहे. शरीराची दुर्गंधी आणि घामापासून सुटका मिळवण्यासाठी जवळपास प्रत्येकजण साबण वापरतो. बाजारात मिळणारे साबण केमिकलवर आधारित असतात, शिवाय त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज बनते. अशा परिस्थितीत, त्वचेला चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी घरगुती संत्र्याच्या सालीचा साबण तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊया संत्र्याच्या सालीचा साबण कसा बनवायचा आणि त्याचे फायदे. ऑरेंज पील साबण कसा बनवायचा ऑरेंज पील सोप बनवण्यासाठी संत्र्याची साले वाळवून बारीक करून त्याची पावडर बनवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट सालेही किसून घेऊ शकता. यानंतर कढईत केमिकल फ्री साबणाचे काही तुकडे ठेवा आणि गॅसवर वितळवा. त्यात संत्र्याच्या सालीची पावडर घाला. साबण पूर्णपणे वितळल्यानंतर, त्यात 1 चमचा कोरफड जेल, एसेंशियल ऑयलचे 5 थेंब आणि व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल घाला. लक्षात ठेवा की या सर्व गोष्टींचे प्रमाण साबणापेक्षा जास्त असू नये. अन्यथा, तुमच्या साबणात फेस होणार नाही. आता हे मिश्रण नीट ढवळून घ्या आणि साच्यात काढा. थोडा वेळाळे थंड झाल्यानंतर आपला संत्र्याच्या सालीचा साबण तयार होईल. ऑरेंज पील सोपचे काही फायदे जाणून घेऊया. चमकदार त्वचा संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्वचेच्या मृत पेशी नष्ट करून नैसर्गिक चमक आणण्याचे काम ते करते. संत्र्याच्या सालीचा साबण नियमित वापरल्याने त्वचा तेजस्वी आणि सुंदर दिसू लागते. हे वाचा - Earth day: आपण सगळे करू शकतो, पृथ्वीला वाचवू शकतो! फक्त 5 गोष्टी आजपासून करूया डाग-पिंपल्स होतात कमी - संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटी-बॅक्टेरियल घटक त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात. ऑरेंज पील सोप सलग काही दिवस लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होऊ लागल्याचे तुम्हाला दिसेल. हे वाचा - तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच त्वचा उजळते - ऑरेंज पील सोप रोज वापरल्याने आपली त्वचा ग्लोईंग तर होईलच शिवाय त्वचेचा टोनही आपोआप सुधारू लागतो. त्वचा उजळते फ्रेश दिसते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)