JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अँथ्रॅक्स हा आजार नेमका काय आहे? कशी घ्यावी काळजी

अँथ्रॅक्स हा आजार नेमका काय आहे? कशी घ्यावी काळजी

अँथ्रॅक्स श्वसनातून शरीरात जाणे हा अँथ्रॅक्स रोगाचा प्रसार करणारा सर्वात सामान्य आणि जीवघेणा प्रकार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अँथ्रॅक्स हा एक गंभीर जीवाणूजन्य आजार आहे. अँथ्रॅक्सचे जीवाणू त्वचा, फुफ्फुसात किंवा पचनसंस्थेमध्ये प्रवेश करतात आणि त्याने व्यक्तीला गंभीर आजारी करतात. यावर वेळेवर उपचार न केल्यास त्याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात. जाणून घ्या की अँथ्रॅक्स रोगाची लक्षणे कोणती आहेत आणि या आजारावर कसा उपचार घेता येऊ शकतो. अशाप्रकारे अँथ्रॅक्स रोगाचा प्रसार होतो अँथ्रॅक्स श्वसनातून शरीरात जाणे हा अँथ्रॅक्स रोगाचा प्रसार करणारा सर्वात सामान्य आणि जीवघेणा प्रकार आहे. myupchar.com शी संबंधीत एम्स चे डॉ. अजय मोहन यांच्या मते एखाद्या संक्रमित प्राण्याला स्पर्श केल्याने किंवा त्याचे मांस खाऊन किंवा एखाद्या संक्रमित प्राण्याद्वारे तयार केलेल्या जीवाणूंच्या उपस्थितीत श्वास घेतल्यानं हा आजार होऊ शकतो. अँथ्रॅक्स रोग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकत नाही. हा केवळ प्राण्यांमध्ये पसरतो. जे लोक प्राण्यांच्या अधिक संपर्कात असतात त्यांनी स्वत: ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अँथ्रॅक्सची लक्षणे जेव्हा अँथ्रॅक्सचा संसर्ग होतो तेव्हा व्यक्ती 1 ते 7 दिवसांच्या आत आजारी होऊ शकते. जर हा संसर्ग एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचला तर 42 दिवस ती व्यक्ती आजारी राहू शकतो. त्वचेवर फोड किंवा मुरुम येऊ शकतात, घश्यात सूज, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत. योग्य उपचार न दिल्यास रुग्ण दगावतो. अँथ्रॅक्स चा उपचार अँथ्रॅक्सच्या उपचारांसाठी डॉक्टरांकडून प्रतिजैविक दिली जातात आणि रुग्ण बरा होईपर्यंत ही औषधे घ्यावी लागतात. हे प्रतिजैविक किमान 60 दिवस घेणे अनिवार्य आहे. ही औषधे घेतल्याने अतिसार, डोकेदुखीसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात, परंतु जोपर्यंत अँथ्रॅक्सचा संसर्ग बरा होत नाही तोपर्यंत या औषधे अजिबात बंद केली जाऊ नयेत. हे वाचा- घशात खवखव; अगदी घरच्या घरी फक्त 5 उपायांनी मिळवा आराम अँथ्रॅक्सची लस myupchar.com शी संबंधीत डॉ. आयुष पांडे यांच्या म्हणण्यानुसार, अँथ्रॅक्सची लस 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. ज्या लोकांना अ‍ॅन्थ्रॅक्स जिवाणूचा धोका असतो अशा लोकांना ही लस दिली जाते. जे लोक प्राण्यांच्या संपर्कात असतात त्यांना संसर्ग टाळण्यासाठी ही लस दिली जाते. या लोकांना अँथ्रॅक्स लसीचे तीन डोस देणे बंधनकारक आहे. पहिल्या डोसनंतर 6 महिन्यांनंतर दुसरा डोस दिला जातो, त्यानंतर 18 महिन्यांनंतर तिसरा डोस दिला जातो. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर या लसीचा अभ्यास केलेला नाही, परंतु ज्या मुलांना अँथ्रॅक्सची लागण होण्याची शंका आहे त्यांना एका आठवड्याच्या अंतराने अँथ्रॅक्स लसीचे तीनही डोस देखील दिले जाऊ शकतात. मांस खाणाऱ्यांनी सावध रहावे ज्या लोकांना मांस खाण्याची सवय असते त्यांना देखील अँथ्रॅक्स होण्याची शक्यता असते. म्हणूनच अशा लोकांना अँथ्रॅक्सची लस देणे महत्वाचे आहे. हॉटेल्समध्ये खाणारे लोक, विशेषत: बाहेर सावध असले पाहिजेत. हॉटेल्समध्ये स्वच्छतेचीही काळजी घेतली जात नाही आणि दररोज मोठ्या संख्येने जनावरांचे मांस आणले जाते, म्हणून बाहेर खाल्ल्याने अँथ्रॅक्स चा संसर्गाची शक्यता जास्त असते. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -  अँथ्रॅक्‍स: लक्षणे, कारणे, उपचार… न्यूज 18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात. अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या