JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मूतखडा ते कॅन्सर, अनेक आजारांवर रामबाण उपाय; या वनस्पतीसाठी बियांचीही लागत नाही गरज

मूतखडा ते कॅन्सर, अनेक आजारांवर रामबाण उपाय; या वनस्पतीसाठी बियांचीही लागत नाही गरज

प्राचीन ग्रंथांमध्ये याविषयी उल्लेख आढळतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 जुलै : निसर्ग (Nature) नेहमीच माणसाला भरभरून देतो. निसर्गात अनेक प्रकारच्या वनस्पती (Plants) आढळतात; मात्र त्याविषयी आपल्याला सखोल माहिती असतेच असं नाही. अनेक वनस्पती मानवी आरोग्यासाठी (Health) उपयुक्त असतात. प्राचीन ग्रंथांमध्ये याविषयी उल्लेख आढळतात. पानफुटी (Kalanchoe pinnata plant) ही वनस्पती त्यापैकीच एक होय. पानफुटी ही वनस्पती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी आहे. मानवी आरोग्यासाठी तर ही वनस्पती वरदान म्हणावी लागेल. आयुर्वेदाच्या (Ayurveda) दृष्टिकोनातून ही वनस्पती अनेक शारीरिक समस्यांवर गुणकारी मानली जाते. मुतखड्यापासून ते त्वचाविकारांपर्यंत अनेक आजार या वनस्पतीच्या माध्यमातून बरे होऊ शकतात. अगदी कॅन्सरवरच्या उपचारांमध्येही पानफुटीचा वापर केला जातो. त्वचेच्या आरोग्यासाठी पानफुटी गुणकारी मानली जाते. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोणतीही वनस्पती येण्यासाठी बी (Seed) गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आपण कलम करूनही एखादी वनस्पती किंवा झाड लावू शकतो; पण पानफुटी या वनस्पतीचं तंत्र वेगळं आहे. या वनस्पतीच्या एका पानाला पुढची पानं फुटत जातात आणि ते पान दुसरीकडे लावलं, तर त्यातून झाड तयार होतं. आयुर्वेदानुसार ही वनस्पती काही आजारांवर विशेष गुणकारी ठरते. Kalanchoe pinnata असं या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे. याशिवाय एअर प्लांट, कॅथेड्रल बेल्स, लाइफ प्लांट, मॅजिक प्लांट आणि पत्थरचट्टा या नावांनीदेखील ही वनस्पती ओळखली जाते. पानफुटी वनस्पतीचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) @nature_videos नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ लाखो लोकांनी लाइक केला आहे. या वनस्पतीची लागवड करण्यासाठी तिची पानं तोडली जात असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या वनस्पतीची पानं चवीला आंबट आणि खारट असतात. ही पानं तुम्ही कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. ही वनस्पती अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. किडनी स्टोन अर्थात मूतखडा, तसंच एक्झिमा, रॅशेस यांसारख्या त्वचा विकारांवर उपचारांसाठी या वनस्पतीचा वापर होतो.

संबंधित बातम्या

तोंडाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी पानफुटीचा वापर होतो. याशिवाय अल्सर, पाठदुखी, नाक, कान, घशाच्या विकारांवरही पानफुटी गुणकारी मानली जाते. कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये (Cancer Treatment) पानफुटीचा वापर होतो. पानफुटीमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दूर होतात. पानफुटी वनस्पती उत्तम वेदनाशामक (Analgesic) आहे. त्यामुळे जखमेच्या वेदना दूर करण्यासाठी पानफुटीचा वापर होतो. तीव्र सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण व्हावं, यासाठी पानफुटीचा वापर उपयुक्त ठरतो. अत्यंत गुणकारी असलेल्या पानफुटीचा वापर करून तुम्ही एखाद्या आजारावरच्या उपचारांवर होणारा खर्च नक्कीच कमी करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या