मुंबई, 08 जुलै: निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकस आहार फार महत्त्वाचा असतो. वरण-भात, पोळी, भाजी या दैनंदिन आहारासोबतच फळं आणि काजू, बदाम, मनुके, अक्रोड या ड्रायफ्रूट्सचा (Dry Fruits) दररोज आहारात समावेश असावा, असं तज्ज्ञ नेहमी सांगत असतात. शरीराला पोषकतत्त्वं (Nutrients) मिळण्यासाठी त्याचा मोठा फायदा होता. उपवास असेल त्यावेळी घरात आपण खजूर (Dates) आणत असतो. मुस्लिम बांधवांच्या रमझान ईद या सणामध्येही बाजारात अनेक ठिकाणी खजुरांची खेरदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मानवी आरोग्यासाठी खजूर अत्यंत गुणकारी ठरतो. विशेषत: पुरुषांसाठी खजूर खूप फायदेशीर आहे. ‘जागरण हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. खजूर त्याच्या गोडव्यामुळे ओळखला जातो. अनेक ठिकाणी तर साखरेला पर्यायी म्हणून खजूराचा वापर करतात. मूळात खजूर हे एक ‘सुपरफूड’ आहे. पुरुषांनी तर याचं अवश्य सेवन करायला हवं. कारण खजुरामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. पोट साफ करण्यासाठी म्हणजेच बद्धकोष्ठतेवर (Constipation) खजूर फायदेशीर असल्याचं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. दररोज खजूर खाल्ल्याने शरीरातील फायबरचं प्रमाण वाढतं. हाडांच्या मजबूतीसाठी खा खजूर खजुरामध्ये अनेक प्रकारची खनिजं आढळतात. यात प्रामुख्याने कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांचा समावेश असतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या (osteoporosis) आजाराला आळा घालता येऊ शकतो. यासह विविध खनिजांमुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते. तल्लख बुद्धी प्रदान करतो खजूर खजुराचं सेवन केल्यास मेंदूला त्याचा चांगला फायदा होतो. मेंदूचं कार्य उत्तम चालण्यासाठी याचा उपयोग होतो. अल्झायमरसारख्या (Alzheimer) आजारांचा धोका यामुळे कमी होऊ शकतो. याशिवाय खजुरामध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीनही असतं. यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते. डायबेटिस नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर खजुरातील ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी मदत होते. ज्या व्यक्तींना डायबेटिस झाला आहे त्यांच्या शरीरात इन्शुलिन स्रवण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यांनी खजुराचं सेवन करायला हवं. त्वचेसाठी अत्यंत गुणकारी वाढलेलं वजन अनेकदा डोकेदुखी ठरत असतं. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आहारात खजुराचा समावेश करायला हवा. कारण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. शिवाय खजूर पुरुषांच्या त्वचेसाठी फार फायदेशीर ठरू शकतो. त्वचा मऊ ठेवायची असल्यास खजूर खायलाच हवेत. खजुरात व्हिटॅमिन सी आणि डी यांचा समावेश असतो. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. अॅलर्जीसाठी चांगला उपाय सतत नाक वाहतं राहणं, नाक चोंदणं, डोळे लाल होणं यासारख्या अॅलर्जीवर खजुराचं सेवन चांगला पर्याय आहे. खजुरात असणारं सल्फर अॅलर्जी रोखण्याचं काम करतं. शिवाय हँगओव्हर झाला असेल तर उपाशीपोटी खजुराचं सेवन अवश्य करावं. याचा चांगला फायदा मिळू शकतो. खजुरामध्ये लोह खनिज (Iron) भरपूर असतं. केसांना मजबूती देण्याचं काम या माध्यमातून होतं. आयर्नमुळे रक्ताभिसरणही (Blood Circulation) चांगलं होतं. केस झपाट्याने वाढण्यासाठी खजुराची मदत होते. प्रजनन क्षमता सुधारते, शुक्राणुंची संख्या वाढते पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी खजूर महत्त्वाचे ठरतात. खजुराचं सेवन केल्यास पुरुषांची प्रजनन क्षमता आणि त्यांच्या शरीरातील शुक्राणुची संख्या व गुणवत्ताही वाढते. खजुरात एस्ट्राडियोल आणि फ्लेवोनोइड (Estradiol And flavonoids) असते, जे शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी मदत करतं. Keywords : Dates Benefits, Diabetes Control, Skin Problems Solutions, Advantages in Alzheimer, Blood Circulations, Dates For Men, खजूरचे फायदे, मधुमेह नियंत्रण, अल्झायमर, news 18 lokmat, marathi batmya Link : https://www.jagran.com/lifestyle/health-10-proven-health-benefits-of-dates-for-men-khajur-khane-ke-fayde-22870697.html नितीन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.