JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना सहज विसरला या गोष्टी, एकदा वाचा

नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना सहज विसरला या गोष्टी, एकदा वाचा

तुम्ही कितीही शिकलेले असलात तरी नोकरी मिळवणं मोठं टास्क आहे. खरंतर असा विचार करूनच काहीजण निराश होतात आणि हातातली चांगली संधी गमावून बसतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जानेवारी : सध्याच्या चंदेरी दुनियेत शिक्षण असूनही चांगली नोकरी मिळणं कठीण होऊन बसलं आहे. प्रत्येक क्षेत्रात आर्थिक मंदी वाढली आहे. अशा तुम्ही कितीही शिकलेले असलात तरी नोकरी मिळवणं मोठं टास्क आहे. खरंतर असा विचार करूनच काहीजण निराश होतात आणि हातातली चांगली संधी गमावून बसतात. त्यामुळे आज जाणून घेऊयात पहिल्यांदा इंटरव्ह्यूला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून केल्या पाहिजेत. तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात, त्यानुसारच तुमचा बायोडाटा असायला हवा. जर वेगवेग्या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये तुम्ही मुलाखती देणार असालत तर बायोडेटात तसे बदल आवश्यक करा. नोकरीच्या स्वरुपाची माहिती घ्या आणि आपल्या प्रोफाइलमध्ये त्या कौशल्यांविषयी माहिती द्या. जेणेकरून त्या पदासाठी तुम्ही कसे योग्य आहात हे कळून येईल. मुलाखत घेणाऱ्याकडे तुमची पहिली ओळख हा बायोडेटाच बनवत असतो, त्यामुळे तो नेटकाच बनवावा. तुम्ही ज्या कंपनीमध्ये नोकरासाठी अर्ज करताय, तिच्याबद्दल जमेल तेवढी माहिती गोळा करा. आधीच्या वर्षभरात पब्लिश झालेल्या त्यांच्या बुकलेटमध्ये कंपनीच्या सर्व कामकाजाची माहिती असते, त्याचा धावात आढावा मुलाखतीपूर्वी घेणं आवश्यक आहे. कंपनीच्या मिशन आणि व्हिजनचा नीट अभ्यास करा. तसंच कंपनी पुरवत असलेल्या सेवा तेथील प्रमुख कर्मचारी, उत्पादनं याचीही ठेवा. कंपनीच्या वेबसाइटवर तुम्हाला ह माहिती मिळू शकते. कंपनीचं सोशल मीडिया पेज असेल तर तेह पाहा म्हणजे ताजी माहिती तुम्हाला कळेल. राशीभविष्य: आज कोणाचे स्टार चमकणार तर कोणाला बसेल फटका? मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांचा सराव करा. मुलाखतीतील सामान्य प्रश्न ही तुमची बलस्थाने आणि तुमच्यातल्या कमतरता, कंपनीने तुम्हाला का नोकरी द्यावी आणि तुमची दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टे इत्यादिंशी संबंधित असतात. सरावाने आत्मविश्वास वाढतो आणि मुख्य मुलाखतीच्या दरम्यान अडखळायला होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान स्पष्ट आणि मोजक्या शब्दात उत्तरे द्या. मुलाखतीला जाताना मुलांनी नेहमी काळी, नेव्ही ब्लू, ग्रे रंगाची ट्राउझर आणि सॉफ्ट रंगाचा शर्ट, पॉलिश केलेले काळे लेदर शूज आणि आवश्यक वाटत असेल तर प्लेन टाय लावून जावं. कोणत्याही प्रकारची ज्वेलरी घालू नका. मुलींनी काळ्या किंवा निळ्या रंगाची ट्राऊझर, सॉफ्ट कलरचा शर्ट, सॉफ्ट कलरचा पंजाबी ड्रेस किंवा साडी परिधान करावी. काळ्या रंगाचे शूज वापरावे. शक्यतो गडद मेकअप टाळावा. मुलाखतीला जाताना वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन ठिकाण असेल तर शक्यतो 10 ते 15 मिनीटे आधीच हजर रहा. यातून तुम्ही वेळेला किती महत्त्व देता हे स्पष्ट होतं. इतर बातम्या - Nirbhaya Case: पवन गुप्ताची फाशी रद्द होणार का?, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या