मुंबई, 15 ऑगस्ट : मशरूम हा अष्टपैलू पदार्थ आहे. वर्षानुवर्षे मशरूमच्या अनेक जाती शोधल्या गेल्या आहेत. परंतु केवळ काही प्रजाती खाण्यायोग्य आहेत. जगभरात अनेक पाककृतींमध्ये मशरूमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषत: चीनी, कोरियन, युरोपियन आणि जपानी. बटण मशरूम कदाचित जगभरात खाल्ल्या जाणार्या सर्वात सामान्य मशरूम प्रकार आहे. मशरूमचे फायदे बरेच आहेत, परंतु त्यांचे सेवन काळजीपूर्वक न केल्यास काही नुकसान देखील होऊ शकते. आज आपण मशरूमचे फायदे, तोटे आणि मशरूम व्हेज असते की नॉनव्हेज याबद्दल माहिती घेणार आहोत. मशरूम व्हेज आहे की नॉनव्हेज मशरूम व्हेज असते की नॉनव्हेज हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. मशरूमला इतर झाडांप्रमाणे पानं, मुळं किंवा बिया नसतात आणि याला वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाचीदेखील गरज पडत नाही. त्यामुळे अनेकजण याला व्हेज किंवा व्हेजिटेबल मनात नाहीत. तसेच मशरूम हे प्राणी किंवा नॉनव्हेज प्रमाणे दिसत नाही आणि यात मांसही नसते. म्हणून याला नॉनव्हेजदेखील म्हणले जाऊ शकता नाही. शास्त्रज्ञांच्यामते, मशरूम हे व्हेज किंवा नॉनव्हेज नसून केवळ एक बुरशी आहे. मात्र अनेक लोकांचे याबद्दल दुमत असू शकते.
Avoid food in dinner: रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खायचे टाळा; लाँग लाईफ निरोगी राहू शकालमशरूम खाण्याचे फायदे - मशरूम ही वनस्पती नसून एक खाद्य बुरशी आहे. ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. सहसा भाजीच्या स्वरूपात म्हणून वापरले जाणारे मशरूम शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. - प्रोटीनव्यतिरिक्त मशरूममध्ये व्हिटॅमिन डी असते. ते आहारातील फायबरचा एक चांगला स्रोतदेखील आहे. मशरूममध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, नियासिन, फोलेट, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असते. - मधुमेह असलेल्या लोकांसाठी मशरूम खूप आरोग्यदायी आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता आणि कमकुवत हाडे असलेल्या लोकांनी त्यांच्या रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करावा. काही किलो वजन कमी करण्याचा विचार करत असताना, मशरूम ही तुमची आवड असू शकते. ग्रीन टी उपयोगी असली तरी कितीवेळा पिणं आहे फायदेशीर; दुष्परिणाम पण समजून घ्या मशरूम खाण्याचे तोटे - याचे अनेक फायदे असले तरी, ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या किंवा ज्यांची किडनी निकामी झालेली आहे. त्यांनी मशरूम खाणे टाळावे. त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना हानी पोहोचते. - मशरूम काळजीपूर्वक खाल्ले नाही तर तुम्हाला पोटदुखी आणि लिव्हरच्या इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. - मशरूम खाल्याने काही लोकांना फूड पॉइजनिंग, पोटात पेटके आणि मळमळदेखील होऊ शकते. त्यामुळे पूर्णपणे ताजे मशरूम खरेदी करणे आणि त्यांना बऱ्याच काळासाठी साठवून न ठेवणे महत्वाचे आहे.