JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पाण्याच्या बाटलीवर अशा रेषा का बनवल्या जातात? डिझाइन नाही तर यामागचं कारण दुसरंच

पाण्याच्या बाटलीवर अशा रेषा का बनवल्या जातात? डिझाइन नाही तर यामागचं कारण दुसरंच

पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या या रेषांचे महत्त्व काय आहे? चला समजून घेऊ.

जाहिरात

सोर्स : गुगल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 31 ऑगस्ट : तुम्ही बाहेरुन कधीतरी पाण्याची बाटली विकत घेतली असणार, त्यावेळी तुम्ही या पाण्याच्या बाटलीवर अशा रेषा पाहिल्या असतील. पण मग कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की पाण्याच्या बाटलीवर अशा रेषा का केल्या जातात? यामागे फक्त डिझाइन हे एकमेव कारण आहे की आणखी काही? असे अनेक लोक आहेत, जे अनेक वर्षांपासून या बाटल्या विकत घेत आहेत, परंतु या बाटल्यांवर नक्षीकाम केलेल्या या रेषांमागील कारण त्यांना माहित नसेल. तुम्ही हेही पाहिलं असेल की वेगवेगळ्या बाटल्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या रेषा बनवल्या जातात, पण या रेषा नक्कीच असतात. चला, आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या बाटल्यांवर बनवलेल्या या रेषांचे महत्त्व काय आहे? हे सांगणार आहोत. हे वाचा : तिने एक सेल्फी घेतली आणि सहा लोकांचा जीव गेला… वाचा काय आहे हे प्रकरण या अशा रेषा बनवण्यामागचं एक कारण त्याचं डिझाइन हे तर आहेच. परंतु पाण्याच्या बाटल्यांवरील या रेषांचे मुख्य कारण म्हणजे मजबूती देणे. हो बाटलीवरील या रेषा बाटलीला मजबूत करता. जर तुम्ही नीट पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, पाण्याच्या बाटल्या हार्ड प्लास्टिकपासून बनवल्या जात नाहीत, तर त्यासाठी सॉफ्ट प्लास्टीक वापलं जातं. मग अशा परिस्थितीत पाण्याच्या बाटल्यांवर या रेषा लावल्या नाही, तर ती बाटली सहज दाबली किंवा वाकली जाऊ शकते. हे वाचा : मागवलं आईस्क्रिम, पण घरी आलं Condom… फूड डिलिव्हरी कंपनी swiggy चं चाललंय तरी काय? याशिवाय पाण्याच्या बाटल्यांवर या रेषा लावण्याचे आणखी एक कारण आहे. पाण्याच्या बाटल्यांवर लाईन्सही दिल्या आहेत जेणेकरून ती पकडताना देखील त्याला चांगली पकड मिळू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या