JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पाण्याची बाटली वापरण्यायोग्य आहे की नाही; पोटात 'विष' जाण्यापूर्वी या पद्धतीनं ओळखा

पाण्याची बाटली वापरण्यायोग्य आहे की नाही; पोटात 'विष' जाण्यापूर्वी या पद्धतीनं ओळखा

आपण पाणी पितो ती प्लॅस्टिकची बाटलीही विषारी असू शकते. प्लॅस्टिकची बाटली विषारी आहे की नाही, हे शोधण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटलीच्या खाली दिलेले नंबर्स व मार्कर्स समजून घ्या.

जाहिरात

वापरण्यायोग्य नसलेली प्लास्टिक बाटली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : मानवी जीवनात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्लॅस्टिकच्या वस्तूंशिवाय आपलं दैनंदिन जीवन अपूर्ण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पाण्याच्या बाटलीपासून ते स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यांपर्यंत प्लॅस्टिकचा वापर केला जातो. जेवणाचा डबाही प्लॅस्टिकचाच वापरला जातो. पण प्लॅस्टिकचा वापर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आपण पाणी पितो ती प्लॅस्टिकची बाटलीही विषारी असू शकते. प्लॅस्टिकची बाटली विषारी आहे की नाही, हे शोधण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटलीच्या खाली दिलेले नंबर्स व मार्कर्स समजून घ्या. प्रत्येक बाटलीखाली एक नंबर लिहिलेला असतो आणि त्यावर मार्कर असतो. ही बाटली वापरण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, हे त्या मार्करवरून ठरवता येतं. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. प्रभात खबर ने या संदर्भात वृत्त दिलंय.

या बाटल्या आहेत सुरक्षित

तुम्ही स्वतःसाठी पाण्याची बाटली विकत घ्यायला जाल तेव्हा तिच्या खाली लिहिलेले अंक आणि मार्कर पाहा. एखाद्या बाटलीच्या तळाशी 2, 4 किंवा 5 नंबर लिहिलेले असतील तर ती खरेदी करा. या बाटल्या पाणी साठवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात. केवळ हे नंबरच नाही, तर तळाशी लिहिलेले शब्द पाहून तुम्ही स्वतःसाठी प्लॅस्टिकची बाटली खरेदी करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्लॅस्टिकच्या बाटलीखाली HDPE (High Density Polyethylene), LDPE (Low Density Polyethylene) आणि PP (Polypropylene) लिहिलेले दिसत असेल तर ती बाटली विकत घेऊ शकता. या बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात.

या बाटल्या वापरताना काळजी घ्या

कोणत्याही बाटलीच्या तळाशी 1 किंवा 7 नंबर लिहिलेले असतील, तर तुम्ही तीही वापरू शकता. पण, या बाटल्यांचा वापर विचारपूर्वक करा, कारण या बाटल्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. या प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर बेव्हरेज बाटल्या, अन्न साठवणारे जार, क्लॉथ फायबर आणि माउथवॉशच्या बाटल्यांसाठी केला जातो. तसंच बाटलीच्या तळाशी PET (Polyethylene Terephthalate) आणि PC (Plastic Others) लिहिलेलं असेल तरी त्यांचा वापर टाळा.

हे वाचा -   फक्त त्वचाच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर आहे बेसन; असा करा वापर

या बाटल्या अजिबात वापरू नका

एखाद्या बाटलीच्या तळाशी 3 किंवा 6 नंबर लिहिलेला असेल तरी ती बाटली चुकूनही खरेदी करू नका. अशा बाटल्या सर्वात हानिकारक असतात. अशा प्लॅस्टिकचा वापर प्रामुख्याने पाईप्स, क्लिनर बाटल्या, स्वयंपाकाच्या तेलाच्या बाटल्या आणि शॉवर कर्टन्स बनवण्यासाठी केला जातो. तसंच जर तुम्हाला कोणत्याही प्लॅस्टिकच्या बाटलीच्या तळाशी PVC (Polyvinyl Chloride) आणि PS (Polystyrene) लिहिलेलं दिसत असेल तर चुकूनही त्याची खरेदी करू नका. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

हे वाचा -   आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी; जाणून घ्या कशी असते या टेस्टची प्रक्रिया?

पिण्याच्या पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी स्टील किंवा तांब्याची बाटली वापरणं कधीही चांगलं असतं. अशा बाटल्या तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवत नाहीत आणि तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या