मुंबई, 26 मे : उन्हाळ्यात केसांची काळजी घेणं तसं सोपं काम नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि गरम हवेमुळे केस कोरडे, निस्तेज आणि खराब होतात. खराब झालेले केस चांगले करण्यासाठी वापरल्या जाणार्या केमिकल्सऐवजी घरी असलेल्या वस्तूंनी केसांची काळजी घ्यायची असेल तर केसांना गुलाबपाणी (rose water) लावा. गुलाबपाणी तुमच्या कोरड्या केसांना चमक देईल आणि केसांची वाढ देखील (Tips to use rose water for hair care) सुधारेल. त्वचा निखळ करण्यासाठी बहुतेक लोक गुलाब पाण्याचा वापर करतात. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, गुलाबपाणी केसांसाठीही तितकेच फायदेशीर आहे जेवढे त्वचेसाठी आहे. उन्हाळ्यात त्वचेवर तसेच केसांना गुलाबपाणी लावल्याने खूप फायदा होतो. जाणून घेऊया केसांना गुलाबपाणी लावण्याच्या पद्धती आणि त्याचे काही फायदे. गुलाब पाण्याने शॅम्पू बनवा - गुलाब पाण्याचा शॅम्पू बनवण्यासाठी केस धुताना 1 चमचा गुलाबजल आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस एक चमचा शॅम्पूमध्ये मिसळून केस धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा गुलाबपाणी केसांना लावल्याने केसांचा कोरडेपणा कमी होतो. यासोबतच केसांचा ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे केस मऊ आणि रेशमी होतात. हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा गुलाब पाण्याचे जेल वापरून पहा - गुलाब पाण्याचे जेल बनवण्यासाठी 2 चमचे कोरफड जेलमध्ये 1 चमचा गुलाबजल आणि व्हिटॅमिन ई ची 1 कॅप्सूल घाला, मिश्रण चांगले मिसळा आणि एअर टाईट डब्ब्यामध्ये ठेवा. शॅम्पूने केस धुतल्यानंतर हे जेल केसांना लावून टाळूवर मसाज करा. काही वेळ सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे केस मॉइश्चरायझ राहतात. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार दिसू लागतात. अँटी-बॅक्टेरियल घटक असलेले हे जेल स्कॅल्प इन्फेक्शन दूर ठेवण्यास देखील मदत करते. हे वाचा - मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात गुलाब पाण्याचा हेअर पॅक लावा - उन्हाळ्यात कोंडा घालवण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी आपण गुलाब पाण्याचे हेअर पॅक देखील वापरून पाहू शकता. यासाठी 1 कप दह्यामध्ये 5 चमचे गुलाबजल, 1 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे मेथी पावडर मिसळून पेस्ट बनवा. हा हेअर मास्क केसांना लावा आणि 30 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून एकदा केसांवर हा हेअर मास्क लावा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)