JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घाबरू नका! कोरोना लस ठरतेय संजीवनी; लसीकरणाच्या 90 दिवसांनंतर केंद्र सरकारने दिला पुरावा

घाबरू नका! कोरोना लस ठरतेय संजीवनी; लसीकरणाच्या 90 दिवसांनंतर केंद्र सरकारने दिला पुरावा

कोरोना लस (Corona vaccine) घेतल्यानंतर बहुतेक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. देशातील हा एकूण आकडा नेमका किती आहे, हे सरकारने सांगितलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 एप्रिल : 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम सुरू करण्यात आली. याला बरोबर तीन महिने पूर्ण झाले आहेत.  देशात आता कोरोना लसीकरणाची (Covid 19 vaccination) व्यापी वाढवण्यात आली आहे. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्व वयाच्या नागरिकांना कोरोना लस (Corona vaccine) दिली जाणार आहे. तरी काही लोकांच्या मनात कोरोना लशीबाबत (Covid 19 vaccine) शंका आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम (Corona vaccine side effect) दिसत आहेत. काही जण लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive after corona vaccination) येत आहेत. त्यामुळे लोक लस घेण्यात संकोच करत आहेत. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशात किती लोकांना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे, याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे आणि एकंदरच हा आकडा पाहिला तर खूपच दिलासादायक असा आहे.

संबंधित बातम्या

केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 13 कोटींपेक्षा जास्त कोरोना डोस देण्यात आले आहेत. कोवॅक्सिनचे 1.1 कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 4,208 आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 695 लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.  कोविशिल्ड लशीचे  11.6  कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी  17, 145 लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर आणि 5014 लोक दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाले. हे वाचा -  मोदी सरकारला 150 रुपयांना मिळणारी Covishield सामान्यांसाठी 400-600 रुपये का? लस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत लस घेऊन कोरोना झालेल्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. तसंच लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही, पण त्याची तीव्रता कमी होते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं, “कोरोना लस घेणं म्हणजे तुम्हाला कोरोनापासून पूर्ण सुरक्षा मिळते असं नाही. तर गंभीर आजारापासून संरक्षण मिळतं. तुम्हाला कोरोना झाला तरी तो गंभीर होत नाही, त्याची लक्षणं गंभीर होत नाहीत आणि परिणामी मृत्यू टाळता येऊ शकतो” हे वाचा -  COVAXIN चा शेवटच्य चाचणीचा निकाल जारी; 18+ लोकांच्या लसीकरणाआधी मोठी माहिती समोर “लस घेतल्यानंतरही तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल पण तुम्ही सुरक्षित आहात. त्यामुळेच तुम्ही लस घेतल्यानंतरही मास्क घालणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना कोरोनाची लागण होणार नाही”, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या