मुंबई, 11 जुलै : मान्सूनचे आगमन होताच केसांशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. मग ते केस गळणे असो (Hair Fall), कोंडा (Dandruff) किंवा मग केस पांढरे होणे (White Hair) असो. पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. केसांची योग्य काळजी न घेतल्यास किंवा स्टाईल करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे वापरत राहिल्यास केसांचे खूप नुकसान होते. ते कमकुवत आणि पांढरे होऊ लागतात. आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांसाठी एक उत्तम उपाय सांगणार आहोत. केसांना पूर्वस्थित आणण्यासाठी तुम्ही कलोंजीचे तेल (Kalonji Hair Oil) आणि हेअर मास्क (Kalonji Hair Mask) वापरू शकता. कलोंजी तेलाने केसांना मसाज केल्यास त्याचा परिणाम तुमच्या केसांवर लवकरच दिसून येईल. कलोंजी हेअर मास्क कलोंजीचा हेअर मास्क (Kalonji Benefits) बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे कलोंजी, 1 चमचा आवळा पावडर, 1 चमचा शिककाई पावडर, 1 चमचा रेठा पावडर, सुमारे 2 चमचे खोबरेल तेल आणि थोडे पाणी घ्यायचे आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला लोखंडी कढईत घ्यायच्या आहेत. केसांच्या मास्कचा रंग लोखंडाच्या भांड्यात गडद होतो. ज्यामुळे केस सहजपणे काळे होऊ शकतात.
मासिक पाळी वेळेवर येत नाही? दुर्लक्ष करू नका, गर्भधारणेदरम्यान येऊ शकतात अडथळेलोखंडी कढईमध्ये आवळा, शिकेकाई आणि रिठा पावडर घ्या त्यामध्ये थोडे पाणी घालून ते रात्रभर भिजत ठेवा. नंतर एका वेगळ्या भांड्यात कलोंजी भाजून घ्या आणि थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करा. यानंतर कढईत हे सर्व एकत्र करा आणि हा हेअर मास्क केसांवर चांगला लावून 1 तासभर ठेवा. आठवड्यातून एकदा हा मास्क लावल्यास हळूहळू तुमचे केस काळे होतील. Clothes Drying Tips : पावसाळ्यातही कपडे सुकवण्याचं आता नो टेन्शन; या सोप्या पद्धतीने झटपट वाळतील कलोंजी तेल कलोंजीचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला एक टेबलस्पून कलोंजी, एक टेबलस्पून मेथीचे दाणे, 200 मिली खोबरेल तेल, 50 मिली एरंडेल तेल आणि एक काचेची बाटली लागेल. तेल बनवण्यासाठी मेथीचे दाणे आणि कलोंजी मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवा. ही पावडर एका भांड्यात काढा. आता खोबरेल तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून त्यात ही पावडर मिसळा. हे तेल काचेच्या बाटलीत ठेवा आणि 2 ते 3 आठवडे सूर्यप्रकाशात ठेवा. तीन आठवड्यांनंतर हे तेल केसांसाठी तयार होते. तुम्ही ते आठवड्यातून दोनदा लावा आणि 1 तासानंतर शॅम्पू करा. काही दिवसातच त्याचा परिणाम केसांवर दिसू लागेल.