JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अतिशय घातक आहेत ही Food Combinations; आयुर्वेदानुसार पाहा काय होतो परिणाम?

अतिशय घातक आहेत ही Food Combinations; आयुर्वेदानुसार पाहा काय होतो परिणाम?

तुम्हीही आवडीने शिकरण खाता का? आयुर्वेदानुसार काही पदार्थ एकमेकांबरोबर खाऊ नयेत असं सांगितलं आहे. आपल्या आरोग्यावर थेट परिणाम (Effect On Health) होतो.

जाहिरात

काही लोकांना जेवल्यानंतर पुन्हा एकदा भूक लागण्याचीही सवय असते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,06 जुलै : निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार (Healthy Diet For Health) घेणं महत्वाचं असलं तरी, आपण कोणत्या प्रकारचा आहार घेत आहोत हे देखील महत्वाचं आहे. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपण जे काही खातो त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम (Effect On Health)  होतो. बर्‍याच वेळा हेल्दी डाएट  घेण्याच्या नादात आपण काही अशा प्रकारचे पदार्थ खातो ज्यामुळे आपल्या आरोग्याला धोका (Side Effects) पोहचतो. काही फूड कॉम्बिनेशन्स (Food Combinations) आरोग्यावर परिणाम करतात. बर्‍याच वेळा आपण पौष्टिक अन्न खातो, पण  ते योग्य कॉम्बिनेशन नसल्याने त्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. असे बरेच खाद्यपदार्थ आहेत, जे एकत्र खाल्ल्याने आरोग्याला आश्चर्यकारक फायदे मिळतात, तर काही कॉम्बिनेशनचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदात, जेवणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण नियम दिलेत. त्याचा आपल्या डेली रूटिमध्ये (Daily Routine) समावेश करावा. ( शाळेतून हाकललेला मुलगा झाला IPS ऑफिसर; अपयशानंतर असं केलं टार्गेट पूर्ण ) खाल्ल्यानंतर लगेच फळं खाऊ नयेत फळं खाण्यासाठीही एक योग्यवेळ निश्चित केलेली आहे. फळ खाण्याची वेळदेखील खुप महत्वाची आहे. इतर खाद्यपदार्थासह फळं खाऊ नयेत. कारण जेवल्यानंतर फळं खाल्ल्याने लवकर पचत नाहीत आणि शरीराला त्यातील सगळी पोषकद्रव्यं मिळत नाहीत. ताजं अन्न खा नेहमीच ताजं जेवण घ्यावं. बराच वेळ ठेवलेलं अन्न खाणं टाळावं. आयुर्वेदानुसार ताजं जेवण घेतल्यास त्यातील पौष्टिक घटक मिळतात. तर शिजवून ठेवलेल्या अन्नातील पोषकाता कमी होत जाते. त्यामुळे बऱ्याचवेळ आधी शिजवलेलं अन्न खाण्याने शरीराला उपयोग होत नाही. ( जाडी वाढेल म्हणून तूप खाणं टाळता? रोज खा साजूक तूप; वजन वाढणार नाही तर होईल कमी ) काळा चहा बऱ्याचदा आपण दूध घालून चहा पितो. पण दूध घालण्याने त्यातील पॉजिटिव्ह इफेक्ट संपतो. म्हणजेच, दूध घातलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक आहे. काही संशोधनानुसार चहामध्ये उपस्थित फ्लेव्होनॉइड्स, म्हणजेच कॅटेचिन्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण जेव्हा चहामध्ये दूध घालतो, तेव्हा त्यात असलेले केसिन्स कॅटेचिन कमी करतात. यामुळे, चहाचे फायदे होत नाहीत. दूध आणि केळी निरोगी राहण्यासाठी बरेचदा लोक दूध आणि केळी एकत्र घेतात. पण हे अनहेल्दी कॉम्बिनेशन आहे. जे पचवायला अवघड आहे.एकत्र खाण्याने शरीरात विष निर्मितीस कारणीभूत ठरू शकतं. ( सुंदर दिसण्यासाठी झोपण्याआधी लावलं क्रीम; सकाळी स्वतःचा चेहरा पाहून तरुणी हादरली ) पातळ पदार्थ आयुर्वेदानुसार, द्रव पदार्थांबरोबर अन्न पदार्थां घेऊ नयेत. यामुळे पाचनाची समस्या उद्भवू शकते. म्हणून, या गोष्टी  जेवणापूर्वी किंवा खाण्याच्या किमान एक तासाच्या आधी घ्या. जेवताना पाणी पिऊ नका खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिणं टाळा. यामुळे अन्न पचवणं अवघड होतं म्हणून खाल्ल्यानंतर काही वेळाने पाणी प्यावं. ( अरे हे काय? महिलेचे कान साफ करताना जे सापडलं ते पाहून डॉक्टरही शॉक ) रात्री दही खाऊ नका काहींना बर्‍याचदा जेवणात दही खाणं देखील आवडतं. पण जेवल्यावर लगेच दही खाणं टाळावं. यामुळे पाचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या