वजन वाढेल या भीतीने तूप न खाणाऱ्यांसाठी ही माहिती महत्वाची आहे. तूपामध्ये व्हिटॅमिन ए, डी असतं. कॅल्शियम,फॉस्फरस,झिंक पोटॅशियम कॉन्जुगेटेड लिनोलेईक ऍसिडही असतं. यामुळे वजन तर, कमी होतंच शिवाय कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो.
2/ 10
पोटाचे आजार असलेल्यांसाठी तूप खाण्याने फायदा होतो. ज्यांना पोट साफ न होण्याचा त्रास असेल त्यांनी रोज रात्री झापण्याआधी 1 ग्लास कोमट दुधात 2 चमचे तूप घालून प्यावं. आयुर्वेदानुसार योग्य प्रमाणात दररोज तूप खाल्ल्यास पचनशक्ती चांगली होते.
3/ 10
तूप खाणाऱ्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. यामुळे अनेक आजार दुर पळतात. रोग प्रतिकारशक्ती सुधारते.
4/ 10
शारीरिक ताकद वाढवण्यासाठी तूप खाण्याचा फायदा होतो. जे लोक दररोज व्यायाम करता किंवा मेहनतीचं काम करतात त्यांनी रोज तूप खावं.
5/ 10
लहान मुलांच्या जेवणात तूपाचा समावेश करावा. तूप खायला दिल्यास लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यात फायदा होतो.
6/ 10
पुरुषांना लैंगिक दुर्बलता जाणवत असेल त्यांनी साजूक तूप खावं. रात्री झोपण्याआधी 2 चमचे तूप आणि मध मिसळून खाल्लाने शरीरिक ताकद आणि वीर्य वाढते.
7/ 10
तूपामुळे शारीरात एनर्जी वाढते. तुपामध्ये मीडियम-चेन-फॅटी ऍसिडसह अनेक पौष्टिक घटक आहेत,जे यकृतात शोषले जातात.
8/ 10
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तूप खायलाच हवं. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती काढते आणि मानसिक आजार कमी होतात.
9/ 10
गर्भवती महिलांनी तूप खायला हवी. यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. गर्भात बाळाची वाढ चांगली होते.
10/ 10
शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तूप खावं. तूपात गुड कोलेस्ट्रॉल असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती न बाळगता. योग्य प्रमाणात तूप खावं.