मुंबई, 18 एप्रिल : फळं आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात हे आपण जाणतोच. यातून आपल्याला अनेकप्रकारची पोषकतत्व मिळतात. रोगप्रतिकारक्षमताही वाढते. (benefits of fruits for health) याच फळांपैकी एक आहे चिकू. चिकू केवळ आरोग्याला उपयोगी आहे असं नाही तर त्याची चवही मस्त असते. चिकूमध्ये अनेक गन असे आहेत जे शरीराला बळकट आणि निरोगी ठेवण्यात मदत करतात. चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. सोबतच यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. हे आहेत चिकू खाण्यानं होणारे फायदे (benefits of eating chiku sapodilla) अपचनाची समस्याच दूर होते (health benefits of chiku fruit) नेटमेड्सच्या एका रिपोर्टनुसार चिकूमध्ये अँटीपॅरासाईटिक, अँटीव्हायरल, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टरिअल गन असतात. यात खूप प्रमाणात फायबर असतं. चिकू अपचनापासून सुटका देतो. बद्धकोष्ठतेपासून दिलासा देत पोटाचं आरोग्य चांगलं राखतो. हाडं मजबूत राहतात (chiku for keeping bones healthy) चिकूतले मिनरल्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, कॉपर आणि लोह हाडं मजबूत करण्यास मदत करते. आहारात कॉपर कमी झाले तर ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. चिकूमध्ये कॉपर असल्यानं तो हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचा आहे. विषाणू आणि जिवाणूपासून करेल बचाव (chiku for health) चिकूमध्ये क आणि अ जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यातून प्रतिकारशक्ती मजबूत बनते. शिवाय त्वचाही चांगली होते. सोबतच शरीराचं जीवाणू आणि विषाणूंपासून रक्षण होतं. त्वचा राहते तरुण (uses of chiku for health) त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यास चिकू एक चांगलं फळ आहे. यात क, अ आणि ई जीवनसत्व असतं. यातून त्वचेत ओलावा राखला जातो. त्वचेच्या पेशी पुन्हा जिवंत होता. सोबतच रंगही उजळतो. वाढलेलं वय जाणवत नाही. त्वचेमध्ये चमक येते. हेही वाचा किडनी स्टोन रोखण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना, आहारात करा ‘हे’ बदल रक्तदाब राहतो नियंत्रित चिकू उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयोगी आहे. यात खूप प्रमाणात पोटॅशियम असतं. चिकू शरीरातील सोडियम कमी करतो. रक्तप्रवाह वाढवून रक्तदाबावर नियंत्रण ठेवतो.