JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / International Yoga Day 2022: High BP चा त्रास असणाऱ्यांनी घरच्या-घरी करा ही 3 योगासनं; दिसेल चांगला परिणाम

International Yoga Day 2022: High BP चा त्रास असणाऱ्यांनी घरच्या-घरी करा ही 3 योगासनं; दिसेल चांगला परिणाम

International Yoga Day: विविध वैद्यकीय उपचार (Medical Treatment) घेऊन बीपीची समस्या नियंत्रणात आणता येते मात्र, हा काही दीर्घकाळ उपाय ठरत नाही. बीपीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी योगासनांचा (Yogasana) पर्याय सर्वात जास्त उपयुक्त ठरू शकतो.

जाहिरात

Representative Image (Photo: Shutterstock)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मार्च : सध्याची लाइफस्टाईल (Lifestyle) फारच हार्ड अँड फास्ट झालेली आहे. त्यामुळं अनेकांना आपल्या आरोग्याकडं व्यवस्थित लक्ष देण्यास वेळही मिळत नाही. आजकाल या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब (High BP) म्हणजेच हाय बीपीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अगदी तरुण पीढीदेखील (Young Generation) या समस्येला बळी पडत आहे. ब्लड प्रेशर वाढण्यास अनेक गोष्टी करणीभूत असू शकतात. अनियमित जीवनशैली, फॅमिली हिस्ट्री (Family History), वय, किडनीचे आजार, लठ्ठपणा (Obesity), व्यायामाचा अभाव इत्यादींचा या कारणांमध्ये समावेश असू शकतो. काही जणांमध्ये ही समस्या खूपच जास्त तीव्रतेची असते. त्यांचा केव्हाही बीपी शूट होतो. विविध वैद्यकीय उपचार (Medical Treatment) घेऊन बीपीची समस्या नियंत्रणात आणता येते मात्र, हा काही दीर्घकाळ उपाय ठरत नाही. बीपीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी योगासनांचा (Yogasana) पर्याय सर्वात जास्त उपयुक्त ठरू शकतो. योग जर्नल (Yoga Journal) या वेबसाइटनुसार, तुम्ही काही ठराविक योगासनांचा सराव करून बीपी वाढण्यापासून रोखू शकता. या तीन योगासनांच्या मदतीनं हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणता येऊ शकतं (Yoga poses to control high bp) बालासन (Balasana/Child’s pose) हे आसन केल्यामुळे ब्लड प्रेशर संतुलित राहतं. मिळालेल्या माहितीनुसार, बालासनामुळे शरीराला आराम मिळतो. हिप्स (Hips) आणि मणक्यासाठीदेखील (Spondyl) या आसनाचा फायदा होतो. बालासन करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर (Yoga Mat) वज्रासनाची पोझिशन घेऊन बसावं. यानंतर श्वास घेऊन दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर घ्या. नंतर श्वास सोडत पुढे वाकून हातांचे तळवे आणि कपाळ जमिनीला टेकवा. या दरम्यान, श्वासोच्छवासाची (Breathing) क्रिया व्यवस्थित राहील याकडं लक्ष द्या. हे वाचा -  तळहातावरची ही चिन्हं जीवनातील प्रतिकूल घटनांचे संकेत अगोदरच देतात

 वीरासन (Virasana/Hero pose)

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी, श्वासोच्छवास क्रियांचा समावेश असलेल्या वीरासनाचा फायदा होतो. वीरासनामुळे मज्जासंस्था (Nervous System) सुरळीत राहते आणि तणाव कमी होतो. परिणामी ब्लड प्रेशरदेखील नियंत्रणात राहतो. वीरासन (Virasana) करण्यासाठी जमिनीवर गुडघे टेकून बसा व हात गुडघ्यांवर ठेवा. तुमचे हिप्स घोट्यांच्यामध्ये आणा आणि हळूहळू गुडघ्यांमधील अंतर कमी करा. यादरम्यान श्वास आतमध्ये ओढून तुमची नाभी आतमध्ये ओढा. काही वेळ या स्थितीमध्ये राहा. शेवटी श्वास सोडून थोडे रिलॅक्स व्हा. हे आसन नियमितपणे केल्यास हाय बीपीचा त्रास कमी होईल. हे वाचा -  त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या शवासन (Shavasana/Corpse Pose) नियमित शवासन (Shavasana) केल्यास हाय बीपी असलेल्या रुग्णांना फायदा होतो. शवासन करण्यासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपा आणि डोळे बंद करा. त्यानंतर आपले पाय पसरवत त्यांना रिलॅक्स करा. आपले हात आणि तळवे शरीराला स्पर्श न करता जमिनीला समांतर पसरवा. असं केल्यास तुमच्या शरीराला एखाद्या मृतदेहाची स्थिती मिळते. त्यानंतर हळू आणि दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. काही वेळ याच स्थितीमध्ये राहा. वरील तिन्ही योगासनं सोपी आहेत. तुम्ही नियमितपणे त्यांचा सराव केल्यास हाय ब्लड प्रेशरसोबतच इतर समस्यांवरदेखील आराम मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य योगासनांच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या