नवी दिल्ली, 29 एप्रिल : चालणे, व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. पण, आजच्या जीवनशैलीत या दोन्ही गोष्टींसाठी वेळ काढणे अनेकांसाठी खूप अवघड आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान अडीच तास व्यायाम करावा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटना (WHO) देते. पण आता एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही आठवड्यातून फक्त 75 मिनिटे वेगाने चालत (Brisk walk) असाल तर तुम्ही डिप्रेशनला (Depression) बळी पडण्यापासून वाचू शकता. डेली मेल मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यूकेच्या केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University) झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर आपण WHO ने सांगितलेल्या वेळेपेक्षा अर्धा वेळ जरी व्यायाम केला तरी नैराश्याची शक्यता 20 टक्क्यांनी कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र, केंब्रिजच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही व्यायामासाठी यापैकी अर्धा वेळ दिला तरी ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले राहील. व्यायामातून मिळणारा आनंद व्यायामामुळे एंडोर्फिन तयार होतात, जे शरीरात चांगले संप्रेरक असतात. त्यातून आपल्याला आनंदाची अनुभूती मिळते. यामुळे नैराश्यग्रस्त लोकांना मदत होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, व्यायामामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीतही बदल होतो. यामुळे ती व्यक्ती अॅक्टीव राहण्यास मदत होते. हे वाचा - तुमच्यावरही digital detox होण्याची वेळ आलीय का बघा; मोबाईलमुळे मानसिकता धोक्यात अभ्यास कसा झाला? हा अभ्यास 1 लाख 90 हजार लोकांवर करण्यात आला. यामध्ये भारत, अमेरिका, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, जपान या युरोपीय देशांतील लोकांचा समावेश होता. अभ्यासात सामील असलेल्या लोकांपैकी 28,000 लोक ताण-तणाव नैराश्याने ग्रस्त होते. संशोधन पथकाचे प्रमुख डॉ. मॅथ्यू पियर्स यांच्या मते, शारीरिक हालचालींचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. नैराश्याचे कारण म्हणजे निद्रानाश, वजन वाढणे, कमजोर डोळे, थकवा, कामात रस नसणे यासारख्या समस्या असू शकतात. हे वाचा - सोनंच पाहिजे असं नाही, अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार धातू खरेदी करणं फायदेशीर औषधापेक्षा अधिक प्रभावी - तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सुमारे 28 कोटी लोक नैराश्याच्या गर्तेत आहेत. यामुळे ते दीर्घकाळ हताश राहतात. काही अभ्यासांनुसार, नैराश्याला सामोरे जाण्यासाठी औषधांपेक्षा (anti-depressants) शारीरिक हालचाली अधिक प्रभावी आहेत.