नवी दिल्ली, 09 मे : कोरोना महामारीच्या काळात संसर्ग टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देण्यात आला होता. यामध्ये व्हिटॅमिन सी, एक चांगला उपाय म्हणून सांगितला गेला आणि लोक न्यूट्रीशनल सप्लीमेंट म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले. संक्रमण गंभीर होण्यापासून व्हिटॅमिन सी (Vitamin C) प्रतिबंधित करते, असे सांगितले गेले. पण, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, किती प्रमाणात ते घ्यावे? माहितीच्या अभावामुळे, अनेक वेळा लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेण्यास सुरुवात करतात. ज्याचे काही दुष्परिणाम देखील नोंदवले गेले आहेत. न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील ओटागो (University of Otago) विद्यापीठातील संशोधनाने आपल्या नवीन अभ्यासात त्याची अचूक माहिती शोधून काढली आहे. अभ्यासानुसार, शास्त्रज्ञ पहिल्यांदाच मानवी शरीरात व्हिटॅमिन सीची किती गरज आहे हे शोधण्यात यशस्वी झाले आहेत. जेणेकरून शरीराला निरोगी राहण्यासाठी योग्य प्रतिकारशक्ती मिळू शकेल. इंटरनॅशनल जर्नल ‘न्यूट्रिएंट्स’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, असे आढळून आले आहे की प्रति 10 किलो अतिरिक्त वजनासाठी एका व्यक्तीला दररोज 10 मिलीग्रामपेक्षा जास्त व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक प्रतिकारशक्ती मिळते. तज्ज्ञ काय म्हणतात - या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि विद्यापीठाच्या पॅथॉलॉजी आणि बायोमेडिकल सायन्स विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अनित्रा कार म्हणाल्या की, पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त वजन असणे हे व्हिटॅमिन सीच्या कमी पातळीशी संबंधित आहे. परंतु हा पहिला अभ्यास आहे, ज्यामध्ये असे मूल्यांकन करण्यात आले आहे की, शरीराच्या वजनानुसार, एखाद्या व्यक्तीला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन सी आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. ते म्हणाले की या शोधामुळे लठ्ठ व्यक्तींना संसर्ग, विशेषत: कोविडपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणे सोपे होऊ शकते. कारण हे सर्वज्ञात आहे की, लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. हे वाचा - रात्री मध्येच जाग येत राहते का? या 6 टिप्स फॉलो करा गाढ झोप लागायलाच हवी ते म्हणाले की, हे देखील समोर आले आहे की जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असाल तर तुम्हाला अतिरिक्त व्हिटॅमिन सीची आवश्यकता असेल. कोविड संसर्गामध्ये निमोनिया ही सर्वात मोठी समस्या आहे आणि हा आजार व्हिटॅमिन सीच्या कमतरतेशी देखील संबंधित आहे. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, व्हिटॅमिन सीमुळे न्यूमोनियाचा धोका कमी होतो आणि जरी झाला तरी त्याची तीव्रता फारशी नसते. त्यामुळे, जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असाल, तर व्हिटॅमिन सीचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ती योग्य राहते. हे वाचा - खळी पडणाऱ्या मुलींच्याबाबतीत ही गोष्ट असते खास; गाल पाहून पण कळतं बरंच काही किती अतिरिक्त प्रमाण आवश्यक आहे - अभ्यासात असे आढळून आले की, जर एखाद्या व्यक्तीचे वजन 90 किलोग्रॅम असेल तर त्याला दररोज 140 मिलीग्राम व्हिटॅमिन सीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 30 मिलीग्राम व्हिटॅमिन सीची आवश्यकता असेल. जर वजन 120 किलो असेल, तर त्याला दररोज 150 मिलीग्राम व्हिटॅमिन सी पातळी गाठण्यासाठी अतिरिक्त 40 मिलीग्राम व्हिटॅमिन सीची आवश्यकता असेल. त्याची गरज पूर्ण करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्यांचा समावेश करणे.