कडुलिंबाची पानं - एक लिटर पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून रोज आंघोळ केल्यास घामोळे निघून जातील.
नवी दिल्ली, 11 मार्च : कडुलिंबाच्या पानांमध्ये (Neem) अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे. कडुलिंबामुळे वेदना, ताप, संसर्गही बरा होऊ शकतो. आजही लोक कडुलिंबाच्या डहाळ्याने दात स्वच्छ करतात. त्याची पानंही उपयोगी आहेतच त्याशिवाय मूळ, फळ, बिया, डहाळी, साल, फूल हे सर्व खूप फायदेशीर आहे. कडुनिंबात सुमारे 140 सक्रिय संयुगे असतात, ज्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कडुनिंबाच्या पानांचा (Neem Leaves benefits) उपयोग अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग, मेंदूशी संबंधित समस्या, त्वचा रोग, केसांच्या समस्या, यकृत, किडनीचे आजार इ. कडुलिंबाच्या पानांप्रमाणेच यापासून तयार केलेला रस देखील खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाचा रस चवीला खूप कडू वाटत असला तरी अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. जाणून घेऊया कडुलिंबाच्या रसाचे कोणते (Neem Juice Benefits) फायदे आहेत. कडुलिंबाच्या रसाचे फायदे OnlyMyHealth मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, कडुलिंबाचा रस शरीरातील रक्त शुद्ध करतो. याव्यतिरिक्त त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. तसेच केस गळणे, कोंडा या समस्या कमी होतात. यामुळे केस अकाली पांढरे होणे आणि टक्कल पडण्यावरही फायदा होतो. कडुलिंबाचा रस डोक्याला लावल्यास त्याचा केसांच्या विविध समस्यांवर फायदा होतो. कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य संसर्गही होत नाहीत. कावीळ, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी त्रस्त असाल तर कडुलिंबाचा अर्क किंवा रस या आजारांचा धोका कमी करू शकतो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मलेरियाला अधिक तीव्र होऊ देत नाहीत, तसेच यकृत मजबूत करतात. कावीळ घालवण्यासाठी कडुलिंबाचा रस थोडासा मध मिसळून प्या. कडुलिंबाचा रस प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हा रस अँटीव्हायरलप्रमाणे काम करतो, त्यामुळे विषाणूजन्य तापात याचा रस फायदेशीर ठरतो. तसेच हृदयाशी संबंधित समस्याही कमी होतात. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही दररोज कडुलिंबाचा रस देखील पिऊ शकता. रात्रंदिवस मोबाईल, कॉम्प्युटरचा वापर केल्याने डोळ्यात दुखणे, सूज येणे असा त्रास होतो. वेगवेगळ्या गॅझेटमधून निघणाऱ्या निळ्या किरणांमुळे डोळ्यांना त्रास होतो. डोळ्यांच्या पाहण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. कडुलिंबाचा रस पित्त आणि कफ दोष संतुलित करून पचनशक्ती सुधारतो. हे वाचा - त्वचा आणि केसांसाठी आंब्याच्या पानांचा असा होतो उपयोग, ही पद्धत जाणून घ्या रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे. जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल तर दररोज थोडासा कडुलिंबाचा रस प्यायल्याने साखरेची पातळी फारशी वाढणार नाही. यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता बर्याच प्रमाणात कमी होईल. तुम्हाला मधुमेह असला तरीही तुम्ही याच्या सेवनाने साखरेची पातळी नियंत्रणात राखू शकता. कडुलिंबाच्या पाण्यामुळे मुरुमांचाही त्रास कमी होतो. या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. पाण्याने चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्याचा ओलावा टिकून राहतो. त्वचेची चमक वाढते. डाग, एक्जिमा, फोड आणि पिंपल्स कमी होतात. हे वाचा - तळहातावरची ही चिन्हं जीवनातील प्रतिकूल घटनांचे संकेत अगोदरच देतात
गरोदरपणात कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने योनीमार्गातील वेदना कमी होतात. प्रसूतीनंतर काही दिवस कडुलिंबाचे पाणी प्यायल्याने अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो. तथापि, गरोदरपणात कडुलिंबाच्या रसाचे जास्त सेवन टाळणे देखील महत्त्वाचे आहे.
दातांचे आजार आणि हिरड्यांमधून रक्तस्रावाची समस्या असल्यास कडुलिंबाची साल, डहाळ्या किंवा पाने पाण्यात उकळून स्वच्छ धुवा. यामुळे दात आणि हिरड्या निरोगी राहतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)