JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Benefits of coriander leaves: हार्टपासून मेंदूपर्यंत कोथिंबीरीचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Benefits of coriander leaves: हार्टपासून मेंदूपर्यंत कोथिंबीरीचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

ज्यांना उच्च रक्तदाब किंवा टाइप 2 मधुमेहाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. आहारात कोथिंबीरीचा समावेश केल्याने कोणत्या आरोग्य समस्या टाळता येतील त्याविषयी जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जून : साधारणपणे कोथिंबीरीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यामुळे अन्नाची चव तर वाढवतेच पण त्याचा सुगंधही खूप फ्रेशनेश आणतो. हेल्थलाइन च्या माहितीनुसार, कोथिंबिरीच्या पानांमध्ये असे अनेक एन्झाइम्स आढळतात जे रक्तातील साखर कमी करण्यात मदत (Health Benefits of coriander leaves) करतात. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा टाइप 2 मधुमेहाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. याची आपण गार्निश ते मसालेदार चटणी बनवून रोजच्या आहाराची चव वाढवू शकतो. आहारात कोथिंबीरीचा समावेश केल्याने कोणत्या आरोग्य समस्या टाळता येतील त्याविषयी जाणून घेऊया. पचन सुधारते - कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे पचन चांगले ठेवण्यास मदत करतात. हिरवी कोथिंबिरी चयापचय वाढवण्यासाठी आणि सूज आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तणाव घालवते - कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट तणाव कमी करण्यास मदत करतात. कोथिंबिरी सेवनाने स्ट्रेसची समस्या कमी होऊ शकते, असे संशोधनात आढळून आले आहे. तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठीदेखील फायदा होतो. हृदयासाठी चांगली - कोथिंबिरीच्या पानामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने व्यतिरिक्त कॅल्शियम, लोह आणि मँगनीज मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कोथिंबिरीच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित समस्या आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. मधुमेह - रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबीरी खूप फायदेशीर आहे. कोथिंबिरी खाल्ल्याने अनेक एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे वाचा -  ही फळं 5 फ्रिजमध्ये ठेवायची चूक इथून पुढं तरी करू नका; पोषक घटक कमी होतात संसर्गामध्ये फायदेशीर - कोथिंबीरीच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबियल घटक आढळतात, जे पोटाच्या संसर्गापासून आणि संक्रमित अन्नामुळे होणा-या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरतात. इतकंच नाही तर हिरवे धणे UTI पासून संरक्षण करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. हे वाचा -  Monkeypox चं संक्रमण वेगानं, ‘या’ देशातल्या आकड्यानं वाढवली जगाची चिंता मेंदूसाठी फायदेशीर - कोथिंबिरीच्या पानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात की मेंदूची सूज, स्मरणशक्ती कमी होणे, चिंता इत्यादी समस्या देखील त्याच्या नियमित सेवनाने कमी होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या