नवी दिल्ली, 21 मार्च : अलिकडे लोक आरोग्यासोबतच त्वचा (Skin) आणि केसांबाबतही (Hairs) खूप जागरूक असतात. चेहऱ्यावर पडलेले डाग आणि पिंपल्स आपलं सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. त्वचेवर डाग आणि मुरुमे दिसण्याची अनेक कारणे असू शकतात. विशेषत: ज्या लोकांना पोटाच्या समस्या असतात त्यांच्या त्वचेवर डाग दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुरुमे येऊ लागतात. त्याचबरोबर धूळ, माती आणि प्रदूषित हवेच्या (Polluted Air) संपर्कात आल्यानं त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. योग्य आहार घेतला नाही तरीही तुम्हाला त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात जंकफूड, तळलेले आणि अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने देखील पिंपल्सची समस्या उद्भवते. यासाठी आपण आज 3 खास प्रकारच्या हेल्दी ड्रिंक्सची माहिती घेऊ. पिंपल्स घालवण्यासाठी तुम्हाला या हर्बल ड्रिंक्सचा आहारात (Herbal Drinks For Pimples) समावेश करता येईल. हे हर्बल पेय प्यायल्याने पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळेल आवळा आणि कोरफड आवळा आणि कोरफड हे दोन्ही आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप चांगले आहेत. आवळा आणि कोरफडीचा रस एकत्र करून रोज सकाळी प्यायल्याने पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळते. या दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे पेय प्यायल्याने पिंपल्सच्या समस्येत आराम मिळतो. हे वाचा - जरा जास्तच चमचमीत-तेलकट पदार्थ खाल्लेत? त्रास कमी करण्यासाठी असं करू शकता मिक्स फळं संत्रा, टरबूज, डाळिंब या फळांचा रस प्यायल्याने केवळ आरोग्यच निरोगी नाही तर त्वचा आणि केसही निरोगी राहतात. यातील पोषक तत्वांमुळे त्वचा चमकदार आणि मुलायम बनते आणि पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळते. मिक्स फ्रूट ड्रिंक प्यायल्याने चेहऱ्यावरील डागही कमी होण्यास मदत मिळते. हे वाचा - दीर्घायुष्य आनंदी, निरोगी राहणं आपल्या हातात आहे, इतकीशी गोष्ट अनेकजण विसरतात हळद आणि लिंबू हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. पिंपल्सवर हळद फायदेशीर ठरते. हळदीमुळे विषाणूजन्य आजारांपासून आरोग्याचे रक्षण होतं आणि त्वचेवरही संक्रमण रोखण्यासाठी फायदा होतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)