JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अधिक गोड तरी शुगर फ्री; डायबेटिज रुग्णांसाठी स्पेशल कलिंगड

अधिक गोड तरी शुगर फ्री; डायबेटिज रुग्णांसाठी स्पेशल कलिंगड

या कलिंगडात (Watermelon) बियाही नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुमित कुमार/पानीपत, 04 जून : मधुमेही (Diabetes) रुग्णांना आहाराची भरपूर काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्यांच्या रक्तातील साखरेचं संतुलन बिघडू शकतं आणि अशाच मधुमेही रुग्णांसाठी हरयाणातील शेतकऱ्याने एक खास कलिंगड (Watermelon) उत्पादित केलं आहे. इतर कलिंगडापेक्षा हे कलिंगड जास्त गोड आहे मात्र शुगर फ्री आहे. विशेष म्हणजे या कलिंगडात बियाही नाहीत. ज्यामुळे लहान मुलांनाही हे कलिंगड खाणं सोयीस्कर आहे. पानीपतमधील शेतकरी रामप्रताप शर्मा यांनी आपल्या शेतात असे विशेष कलिंगड उत्पादित केलेत. त्यांनी आपल्या शेतात 500 कलिंगडाची रोपे लावली होती. या सर्व रोपांपासून आता उत्पादन मिळू लागलं आहे. हे वाचा -  त्या गर्भवती हत्तीणीला मारणाऱ्या नराधमांचा शोध सुरू; देशभरातून वाढला दबाव शेतकरी रामप्रताप यांनी सांगितलं की, या कलिंगडात बिया नाहीत. इतर कलिंगडापेक्षा हे 13% जास्त गोड आहे. मात्र पूर्णपणे शुगर फ्री आहे. एका कलिंगडाचं वजन 4 ते 6 किलो आहे. जर शेतकऱ्यांनी अशा कलिंगडाचं उत्पादन घेतलं तर त्यांना बाजारात चांगला भाव मिळेल आणि मागणीही जास्त असेल. कमी मेहनतीत या कलिंगडाचं जास्त उत्पादन मिळतं. हे वाचा -  मुलं चिडचिडी आणि रागिष्ट झालीत; असू शकतो मानसिक आजार रामप्रताप शर्मा  यांना ऑर्गेनिक शेतीसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी आपल्या शेताजवळच दुकान उघडलं. दररोज 40 ते 50 ग्राहक त्यांच्याकडे भाजी खरेदीसाठी येत असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या