मुंबई, 29 जुलै : CoWIN पोर्टलचा वापर मुलांना पोलिओ (Polio), हिपेटायटिस यांसारख्या नियमित लसी देण्यासाठी करता येईल का, याबाबत सरकार विचार करत आहे. सध्या, कोविनचा वापर कोरोनाविरूद्ध लसीकरणाची (Corona Vaccination) नोंदणी करण्यासाठी केला जात आहे. CoWIN वेबसाईटला भेट देऊन देशातील कोणतीही व्यक्ती कोरोना लस मिळवण्यासाठी ठिकाण, केंद्र आणि तारीख निवडू शकते.
न्यूज 18 च्या बातमीनुसार, आता सरकार या पोर्टलचा वापर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामअंतर्गत (Universal Immunization Program) मुलांच्या लसीकरणासाठी करू इच्छित आहे. कोविन पोर्टलच्या वापराची व्याप्ती वाढवण्याचं काम सुरू असून, इतर आजारांच्या लसीकरणासाठी या पोर्टलचा वापर काही महिन्यांत सुरू होऊ शकतो, असं नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीचे सीईओ आर. एस. शर्मा यांनी न्यूज18 ला सांगितलं.
Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील
शर्मा यांनी देशातील सरकारच्या आयटी संबंधित कार्यक्रमांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. आधार कार्डाची यंत्रणा तयार करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. ते UIDAI चे डायरेक्टर जनरल आणि मिशन डायरेक्टर होते. तसंच CoWIN तयार करण्याचं श्रेयही त्यांना जातं. “युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅमसाठी कोविन प्लॅटफॉर्ममध्ये बदल केले जात आहेत. त्याची आधीची फीचर्स आहेत, तीच राहतील. इम्युनायझेशन प्रोग्रॅमच्या कव्हरेजला ट्रॅक करण्यासाठी हे पोर्टल खूप फायदेशीर आहे,” असंही शर्मा म्हणाले.
नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर, कोविन मुलांच्या पालकांना लसीकरणासाठी रिमाइंडर पाठवेल. सध्या हे पोर्टल लोकांना कोरोनाची लस घेण्यासाठी रिमाइंडर पाठवत आहे. शर्मा यांनी एका उदाहरणाच्या मदतीने हे स्पष्ट करून सांगितलं. ते म्हणाले की “समजा तुमच्या मुलाच्या पोलिओ लसीची तारीख जवळ आली आहे किंवा येत आहे, तर सिस्टम त्याच्या/तिच्या पालकांना एक रिमाइंडर मेसेज पाठवेल. CoWINचे बेसिक फंक्शन्स आधीसारखेच राहतील. पोर्टलवर तुमच्या भागातील ज्या रुग्णालयांमध्ये लस घेण्याची सुविधा असेल ती सर्व केंद्र दिसतील. मुलांच्या पालकांना फक्त त्यांच्या मोबाईल नंबरवरून अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.”
ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
मुलांचं लसीकरण झाल्यानंतर पालक या वेबसाइटवरून व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट (Vaccination Certificate) डाउनलोड करू शकतील. कोविन हा जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारा टेक प्लॅटफॉर्म आहे, असं म्हटलं जातंय. यावर एका दिवसात 2.5 कोटी व्हॅक्सिन रजिस्ट्रेशनचा रेकॉर्ड आहे. भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पोर्टलच्या मदतीने सर्वांनाच व्हॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन करणं आणि जवळच्या केंद्रात जाऊन व्हॅक्सिन घेणं सोपं गेलं.