यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.
ब्रिटन, 29 जून : सेक्स (Sex) करताना अनेक पोझिशन असतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने सेक्स करायला आवडतं. एका विशिष्ट पद्धतीने सेक्स करण्यावर अनेकांच्या उत्तेजना अवलंबून असतात. अशाच उत्तेजनासाठी एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसमोर असा हट्ट केला की बॉयफ्रेंडही शॉक झाला. गर्लफ्रेंडचा हा विचित्र हट्ट पुरवायचा तरी कसा, असं टेन्शन त्याला आलं. अखेर त्याने तज्ज्ञांकडून मदत मागितली. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 52 वर्षांच्या व्यक्तीची 49 वर्षांची गर्लफ्रेंड. दोघंही एकमेकांना ऑनलाइन भेटले आणि चार महिन्यांपूर्वी डेटिंग सुरू केली. शारीरिकरित्याही दोघं एकत्र आले. सेक्स करताना आता त्याची गर्लफ्रेंड त्याला चक्क आपला गळा दाबायला (Girlfriend asked boyfriend to strangle her during sex) सांगते. तिची ही मागणी ऐकून त्याला धक्काच बसला कारण त्याने असं कधीच केलं नव्हतं द सन च्या रिपोर्टनुसार या व्यक्तीने सांगितलं, त्याची गर्लफ्रेंड एका चांगल्या कुटुंबातील महिला आहे. चांगली नोकरी करते. तिची मुलं मोठं झाली आहेत आणि ते त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगत आहेत. याव्यक्तीचाही सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे आणि त्याला एक मुलगी आहे. हे वाचा - सिक्स पॅक अॅब्ज नाही पोट सुटलेला नवरा हवा! अशा पुरुषासाठी इथं तरुणींच्या रांगा हा व्यक्ती म्हणाला, “आमची आतापर्यंतची सेक्स लाइफ खूपच चांगली होती. ती खूप धाडसी आहे आणि कोणत्याच कामात अडथळा आणत नाही. प्रत्येक बाबतीत ती फिट आहे, तेच मला आवडतं. एके रात्री आम्ही सेक्स करत होतो, तेव्हा तिने मला माझे दोन्ही हात तिच्या गळ्यात टाकून गळा दाबायला सांगितला. मला सुरुवातीला वाटलं की ती मस्करी करत असावी, पण नंतर तिने तिला असंच खरंच हवं असल्याचं सांगितलं. तिने सांगितलं की एका पुरुषाचे हाथ तिच्या गळ्यावर लागल्यानंतर ती खूप बदलते” “तिला जे हवं होतं ते मी केलं. पण खूप हळुवारपणे. एखाद्या सेक्स फिल्ममध्ये काम करावं, तसं काम मी करतो आहे, असंच मला वाटलं. नंतर मला हे भयानक वाटलं. माझ्यासाठी हे पूर्ण विचित्र होतं”, असं तो म्हणाला. हे वाचा - सप्तपदीआधी नवरीने सांगितली ‘मन की बात’; आल्या पावली रिकाम्या हाती परतली वरात आता या व्यक्तीने आपल्या समस्यांचं निराकारण मागितलं आहे. ब्रीद प्ले करून ऑक्सिजन रोखणं यामुळे संवेदना वाढू शकतील पण ते घातकही ठरू शकतं. त्यामुळे बेडरूममध्ये ज्या गोष्टी करण्याची तयारी नसेल त्या गोष्टी दबावाने कधीच करू नये. त्यापेक्षा जोडीदाराला वेगळ्या पद्धतीने उत्तेजित कऱण्याचा प्रयत्न करा. असा सल्ला तज्ज्ञांनी या व्यक्तीला दिला.