हेलसिंकी, 16 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग (Social distancing) ठेवावं, अशा सूचना देण्यात आल्यात. मात्र तरीही लोकांना त्यांचं गांभीर्य समजलेलं नाही. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व समजावं म्हणून फिनलँडमधील (Finland) एका न्यूजपेपरनं (newspaper) भन्नाट आयडिया शोधली आहे. या न्यूजपेपरनं आपल्या पहिल्या पानावरील जाहिरात अशी दिली आहे, जी जवळून वाचताच येत, 6 फुटांवरून ही जाहिरात दिसते. फिनलँडच्या हेलसिंगिन सॅनोमेटनं (Helsingin Sanomat) ही वेगळी अशी जाहिरात प्रकाशित केली आहे. याचा न्यूजपेपरचा फोटा ट्विट करण्यात आला आहे. अमेरिकन कंपनी नेमन लॅबनं या वृत्तपत्राचा फोटो ट्विट केला आहे.
या जाहिरातीचा फोटो ट्विट करण्यात आला आहे, ज्यामध्ये जाहिरात जवळून पाहिला असता कशी दिसते, त्याचा फोटो डाव्या बाजूला आहे, 6 फुटांवरून कशी दिसते, याचा फोटा उजव्या बाजूला आहे. हे वाचा - आता कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहा; आरोग्य तज्ज्ञांनी केलं सावध हे वृत्तपत्रं प्रकाशित करणाऱ्या या संस्थेनं अशा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे कोणतीही जाहिरात जवळून वाचता येणार नाही. फक्त 6 फूट लांबूनच या जाहिरातीतील शब्द स्पष्ट दिसतात. डिजिटल जाहिरात एजन्सी ‘द स्टेबल’ने सांगितल्यानुसार फिनलँडचं हे वृत्तपत्रं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व समजवण्यासाठी प्रकाशित करण्यात आलं आहे. यामध्ये लोकांना एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वृत्तपत्राची चर्चा सध्या सर्वत्र होते आहे. सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करणाऱ्या टॉयलेट साफ करण्याची शिक्षा अनेक लोकं सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. इंडोनेशियामध्ये (Indonesia) अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. गल्फ न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागती. सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - सावधान! मोबाइल फोनमुळे पसरू शकतो कोरोना, डॉक्टरांनी दिला ‘हा’ इशारा