मुंबई, 30 जुलै : सध्या खूप धावपळीचा काळ आहे. जगाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतात. अशावेळी आपले आरोग्य चांगले असणे खूप गरजेचे असते. पुरुषांना आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी उत्तम आहार आणि व्यायामाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत काही पदार्थ तुमची मदत करू शकतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे अंजीर. अंजीरामध्ये पोटॅशियम, मिनरल्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. अंजीर खाल्यास पुरुषांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. जाणून घेऊया त्या फायद्यांबद्दल… पुरुषांनी अंजीर खाण्याचे फायदे ताकद मिळेल अंजीर खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता भासत नाही. अंजीरमध्ये व्हिटॅमिन्स, सल्फर आणि क्लोरीन जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही ऊर्जेची कमतरता दूर होऊ शकते. हाडे मजबूत होतील हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा समावेश नक्की करायला हवा. अंजीरामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांना कमकुवत होण्यापासून वाचवते.
Health Tips : पावसाळ्यात ‘या’ गोष्टी खाणं टाळा, नाहीतर आरोग्यावर होईल गंभीर परिणामवजन कमी करते अंजीराच्या सेवनाने लठ्ठपणा कमी करता येतो. अंजीरमध्ये खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. याशिवाय अंजीरमध्ये फॅटचे प्रमाणही खूप कमी असते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठी अंजीराचे सेवन फायदेशीर ठरू शकते. अंजीर खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अंजीर खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आलं; सर्दी-खोकलाच नाही तर या आजारांवरही अतिशय फायदेशीर ही आहे अंजीर खाण्याची योग्य पद्धत अंजीर तुम्ही कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. कच्चे, किंवा शिजवलेले. मात्र सध्या सुकवून ते ड्रायफ्रुट्ससारखे खाण्याचा ट्रेंड अधिक आहे. जर पुरुषांना या फळाचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर अंजीर रात्री पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते खावे. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी ते दुधात घालूनदेखील पितात.