जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Health Tips : पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Health Tips : पावसाळ्यात 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Monsoon Tips

Monsoon Tips

हवामानानुसार जर आहार घेतला तर पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात काय खावं काय खाऊ नये याविषयी जाणून घ्या.

    नवी दिल्ली, 29 जुलै :  पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळी हवेत काहीतरी गरमागरम चमचमीत खावंसं वाटतं. अनेकदा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण ते खातोही; पण उलट पावसाळ्यात आपल्या पोटाची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात पोट लवकर खराब होतं. त्यामुळे पावसाळ्यात आहार अगदी काळजीपूर्वक केला पाहिजे. याबाबत अधिक माहिती टीव्ही 9 भारतवर्षच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंद होते. प्रतिकारशक्तीही (Immune System) कमी होते. त्यामुळे ताप, खोकला आणि फ्लूची (Cough and Flu) शक्यता वाढते. त्याचबरोबर बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. त्यामुळे या हवेमध्ये आपल्या तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. खाण्यापिण्याबाबत अत्यंत खबरदारी घेणं आवश्यक आहे. या हवामानानुसार जर आहार घेतला तर पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो, असं आयुर्वेदात (Ayurveda) सांगितलं आहे. चला तर मग, जाणून घेऊया मान्सून डाएटबद्दल. हे डाएट तुमचं पोट आणि प्रतिकारशक्ती दोन्हीसाठी अत्यंत योग्य आहे. पावसाळ्यात काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दलची माहिती जाणून घेऊया. हिरव्या पालेभाज्या खाऊ नका पावसाळ्यात पालक, मेथी, चंदनबटवा, वांगी, कोबी, फ्लॉवर अशा भाज्या खाणं शक्यतो टाळावं. या हवामानात या भाज्यांमध्ये काही अळ्या, कीडे आणि जंतू असतातच. त्यांची अंडीही भाज्यांच्या देठांना लागलेली असतात. ते खाल्ल्यामुळे पोट खराब होतं. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात पालेभाज्या खाऊ नयेत. तसंच फळं खायची असल्यास ती कापली की लगेचच खावीत. फळे कापून जास्त वेळ ठेवू नयेत. हेही वाचा - औषधी गुणांनी परिपूर्ण आहे आलं; सर्दी-खोकलाच नाही तर या आजारांवरही अतिशय फायदेशीर दूध आणि दुधाचे पदार्थ टाळा (Avoid Milk And Dairy Products) पावसाळ्यात दूध, दही, पनीर, ताक, लस्सी असे डेअरी प्रॉड्क्टस (Dairy Products) खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. पावसाळी हवेत पचनक्रिया मंदावते. त्यामुळे हे पदार्थ लवकर पचत नाहीत. तसंच कफाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळेच पावसाळ्यात दुधाचे पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलं जातं. दूध प्यायचंच असेल तर कोमट करून आणि त्यात हळद घालून मगच प्या. मासे, प्रॉन्समुळे अन्नातून विषबाधेचा धोका पावसाळ्यात मासे, प्रॉन्स आणि अन्य सी फूड (Avoid Sea Food) खाऊ नये असं सांगितलं जातं. पावसाळ्याचा हंगाम हा समुद्री जीवांच्या प्रजननाचा काळ असतो. तसंच पावसाळ्यात पाणी गढूळ आणि दूषितही होतं. त्यामुळे पावसाळ्यात हे पदार्थ खाल्ल्यास त्यातून विषबाधाही (Food Poisoning) होऊ शकते. हेही वाचा - मुलांना नियमित लसी देण्यासाठी होणार CoWIN चा वापर, सरकार पोर्टलचा विस्तार करण्याच्या तयारीत बाहेरच्या खाण्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता पावसाळ्यात बाहेरचं चमचमीत खावंसं तर वाटतंच. पण नेमकं हेच आपल्या तब्येतीला धोकादायक ठरू शकतं. टिक्की, पाणीपुरी, चाट, वडापाव, सामोसे हे कितीही वाटलं तरी बाहेरचं आणि विशेषत: उघड्यावरचे पदार्थ आहेत त्यामुळे ते खाऊ नयेत. हे पदार्थ पचायला अत्यंत जड असतात आणि त्यामुळे पोटासाठी त्रासदायक ठरू शकतात. पावसाळ्यात तेलकट आणि तिखट पदार्थ खाणं शक्यतो टाळावं. पावसाळ्यात काय खावं? मग पावसाळ्यात काय खाल्लं पाहिजे असा प्रश्न पडतो. तर शक्यतो पावसाळ्यात पचायला हलके पदार्थ, भाज्या खाव्यात. पावसाळी हवेत कारली, दुधी भोपळा, ओली हळद, मेथी, काळी मिरी, लवंग, आलं यांचा आपल्या आहारात अवश्य समावेश करा. या पदार्थांमुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात आणि शरीर अनेक रोग किंवा संसर्गापासून दूर राहतं. त्याशिवाय घरात केलेलं ताजं अन्नच खा. पावसाळ्यात पाणी लवकर गढूळ होतं. त्या पाण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. स्वच्छ पाणीच प्या

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात