मुंबई, 25 मार्च : कधी कधी आपल्याला छोट्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागते. वास्तूशी संबंधित झालेल्या चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात. घरातील आनंदी वातावरण नाहीसं होतं. कर्ते पुरुष कर्जाच्या ओझ्याखाली दबली जातात, ज्याची परतफेड करणं अवघड होतं. वास्तुदोषामुळे (Vastushastra Mistekes) आयुष्यात विचित्र समस्या निर्माण होऊ शकतात. घरात नकळत होणाऱ्या काही चुका वास्तुशास्त्रात सांगितल्या आहेत. यातील काही महत्त्वाच्या चुकांची माहिती (Vastu Tips) घेऊया. 1. आज तक ने दिलेल्या बातमीनुसार, काही लोक कचऱ्यासाठी वापरलेले डस्टबिन घराबाहेर किंवा प्रवेशद्वाराजवळ ठेवतात. वास्तूशास्त्रानुसार असं केल्यानं देवी लक्ष्मी क्रोधित होते. ही एक चूक श्रीमंत व्यक्तीलाही गरीब बनवू शकते. त्यामुळे घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. इथे डस्टबिन ठेवण्याची चूक करू नका. 2. असे अनेक लोक आहेत ज्यांना बेडवर आरामात बसून जेवायला आवडतं. याबाबत वास्तुशास्त्रात कडक इशारा देण्यात आला आहे. ही एक चूक माणसाला गरीब बनवू शकते. यामुळे घराच्या सुख-समृद्धीलाही बाधा येते, पुढे आर्थिक चणचण होऊन आपण कर्जबाजारी होऊ शकतो. 3. रात्री स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं. काही कारणास्तव तुम्ही रात्री खरकटी भांडी धुतली नाहीत तर ती स्वयंपाकघरात ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर नीट स्वच्छ करावं, त्याकडं दुर्लक्ष झाल्यास घरात नेहमीच आर्थिक संकट येत राहतील. हे वाचा - दूध पिण्याच्याबाबतीत अशी चूक बरेचजण करतात; या वेळात प्यायल्यानं अनेक त्रास होतात 4. हिंदू धर्मात दानाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. पण संध्याकाळी दूध, दही आणि मीठ दान केल्याने तुम्ही कंगाल होऊ शकता. वास्तूशास्त्रानुसार संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्यास घरात आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळे सूर्यास्तानंतर या वस्तूंचे दान करण्याची चूक करू नका. हे वाचा - स्वयंपाक करताना कोणत्या धातूची भांडी वापरावीत? अनेकांची यात गफलत होते 5. रात्री किचन किंवा बाथरूममध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. बाथरूममध्ये नेहमी किमान एक बादली पाणी ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)