नवी दिल्ली, 23 मार्च : स्वयंपाकासाठी (cooking food) आपण भाज्या चांगल्या प्रकारे स्वच्छ करतो, भांडी स्वच्छतेचीही काळजी घेतो. आपले पूर्ण लक्ष आपण काय खातो याकडे आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यात स्वयंपाक (cooking food) करत आहात, त्याचा तुमच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. अशी अनेक धातू आहेत ज्यात स्वयंपाक केल्याने त्यांचे पोषक घटकच नष्ट होत नाहीत, तर ते शरीरासाठी विषारी देखील बनतात. तांबे - तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आणि अन्न खाणे सुरक्षित मानले जाते. परंतु, या धातूला उच्च तापमानात गरम करणे टाळावे. याचे कारण असे की ते अग्नीवर वेगाने प्रतिक्रिया देते. उच्च उष्णतेवर तांब्याच्या भांड्यात मीठ आणि आम्ल मिसळल्यामुळे अनेक प्रकारची रसायने तयार होऊ लागतात. अॅल्युमिनियम - अॅल्युमिनियम उच्च तापमान पटकन शोषून घेते आणि खूप मजबूत असते. हेच कारण आहे की बरेच लोक अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करण्यास प्राधान्य देतात. मात्र, गरम झाल्यावर अॅल्युमिनियमची आम्लीय खाद्यपदार्थांशी रासायनिक अभिक्रिया होते, जसे टोमॅटो आणि व्हिनेगर. धातूची ही प्रतिक्रिया अन्न विषारी बनवू शकते. यामुळे पोटात वेदना होऊ शकते आणि मळमळ देखील जाणवते. अॅल्युमिनियम हा एक जड धातू आहे, जो हळूहळू आपल्या अन्नात प्रवेश करतो. हे वाचा - महागड्या क्रीमवरील वाचेल खर्च; शिल्लक राहिलेल्या फळांचा असा करा स्मार्ट उपयोग पितळ - पितळी भांडीला खूप जड आधार असतो आणि सामान्यतः पारंपारिक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जातो. चिकन, मटण आणि बिर्याणी सारखे अनेक पदार्थ आहेत जे तयार करायला जास्त वेळ लागतो. अनेक देशांमध्ये हे विशेष प्रकारचे अन्न फक्त पितळी भांडीमध्ये बनवले जाते. मीठ आणि आम्ल उच्च तापमानात पितळी भांडीतील पदार्थांसोबत प्रतिक्रिया देतात, म्हणून पितळात स्वयंपाक करणे टाळावे. हे भांडे तळण्यासाठी किंवा तांदूळ बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे वाचा - मेंदुच्या प्रक्रियेवर परिणाम करतात हे पदार्थ; त्याचं सेवन करावं लागेल कमी मातीची भांडी- मातीची भांडी स्वयंपाकासाठी सर्वात सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे. मातीची भांडी त्यांच्या खास शैलीमुळे आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत. मात्र, स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो आणि ती सांभाळणेही कठीण असते. म्हणूनच अनेकांना मातीच्या भांड्यात अन्न शिजवणे अवघड जाते. स्टेनलेस स्टील - स्वयंपाकासाठी आणखी एक लोकप्रिय धातू म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि चमकदार आहे, ज्यामुळे ते अधिक चांगले मानले जाते. स्टेनलेस स्टील कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही, परंतु या धातूचा चांगुलपणा त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. स्टेनलेस स्टील मुळात क्रोमियम, निकेल, सिलिकॉन आणि कार्बनचे बनलेले काही धातूंचे मिश्रण आहे. स्टेनलेस स्टीलची भांडी अत्यंत काळजीपूर्वक खरेदी करावीत. नेहमी विश्वसनीय दुकानातून किंवा कंपनीकडून खरेदी करा. कारण बनावट स्टेनलेस स्टीलची भांडी आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.