डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं?
मुंबई, 5 डिसेंबर: 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’ किंवा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हटलं जातं. महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादरस्थित चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. महापरिनिर्वाण म्हणजे काय? बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण ’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. हेही वाचा: महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांना लिहून द्या झक्कास भाषण चैत्यभूमीला लाखो लोक देतात भेट- मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो येतात. अत्यंत आदरानं चैत्यभूमीला भेट देतात. बाबासाहेबांची प्रतिमा व मुर्तीसमोर अभिवादन करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा-