मुंबई, 5 डिसेंबर: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी कित्येक लोकांनी आपलं आयुष्य वेचलं. कित्येक लोकांनी बलिदान दिलं. समाजसुधारणा, क्रांतिकार्य, राजकारण इत्यादी सर्व माध्यमातून अनेक लोक आपापल्या क्षमतेनं देशासाठी झटत होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठं योगदान दिलं. देशात समता, बंधुता नांदावी म्हणून ते आयुष्यभर झटत होते. देशामधील जातीभेद नाहीसा व्हावा, दलित बांधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून डॉ. आंबेडकर शेवटपर्यंत लढले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची राज्यघटना बनवण्याची जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थपणे पेलली. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं.
आज 6 डिसेंबर...भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन...1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं होतं. त्यामुळंच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस म्हटलं जातं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात आपल्या घरातील लहान मुलंही भाषण करतात. तुमच्या घरातील लहान मुलांना भाषण लिहून देण्याचं काम तुम्हालाच करावं लागतं आणि तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारीही करून घ्यावी लागते. यंदा तुम्ही भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (childrens day speech for children) करून घेताना पुढील 10 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात..
हेही वाचा: Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death anniversary, Dr. Babasaheb Ambedkar, Mahaparinirvan divas, School children