चैत्यभूमी : जिथं दरवर्षी लोटतो अभूतपूर्व जनसागर

सरदार पटेल यांच्या अंत्यसंस्कारानंतर (1950) भारतीय इतिहासातील ही अशी दुसरी अंत्ययात्रा होती, ज्यामध्ये प्रचंड जनसागर उसळला होता. 

ती जागा आता चैत्यभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिल्ली येथे झाले. 

त्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तत्कालीन बॉम्बे (आता मुंबई) येथील दादर चौपाटी निवडण्यात आली. 

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. आंबेडकर यांच्या अधिकृत निवासस्थान, 26 अलीपूर रोड, नवी दिल्ली येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली होती.

7 डिसेंबर 1956 रोजी डॉ. आंबेडकरांच्या अंत्ययात्रेसाठी 5 लाखांहून अधिक लोक आले होते.

तेव्हापासून दरवर्षी 'महापरिनिर्वाण दिना'ला डॉ. आंबेडकरांना मानणारे लाखो अनुयायी आदरांजली अर्पण करण्यासाठी येथे गर्दी करतात. 

5 डिसेंबर 1971 रोजी डॉ. आंबेडकरांच्या सून मीरा आंबेडकर यांनी चैत्यभूमीचे लोकार्पण केलं.

कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे या ठिकाणी येण्यावर निर्बंध होते. 

मात्र, यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.