JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हाडांच्या दुखण्याला संधीवात समजण्याची चूक करू नका; हा गंभीर आजार झालेला असू शकतो

हाडांच्या दुखण्याला संधीवात समजण्याची चूक करू नका; हा गंभीर आजार झालेला असू शकतो

अनेक वेळा हाडांच्या या दुखण्याकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. काही लोक हाडांच्या कर्करोगाच्या वेदनाला संधिवात किंवा कामाचा ताण समजण्याची चूक करतात.

जाहिरात

मजबूत हाडांसाठी तुमच्या आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. कारण हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते. हाडांसाठी कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 एप्रिल : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायलाही वेळ मिळत नाही, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. असे काही गंभीर आजार देखील आहेत ज्यांची प्रथम लक्षणे दिसत नाहीत आणि नंतर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं खूप कठीण होते. यापैकी एक म्हणजे हाडांचा कॅन्सर (Bone cancer). हाडांचा कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे श्रोणि, हात आणि पायाच्या लांब हाडांमध्ये आढळतो. हाडांचा कर्करोग अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्याची लक्षणे फक्त 1 टक्के लोकांमध्ये दिसतात. आज तक ने दिलेल्या बातमीनुसार,  हाडांच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे हाडे दुखणे (Bone Pains). कालांतराने ही वेदना आणखी वाढते. पण अनेक वेळा हाडांच्या या दुखण्याकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. काही लोक हाडांच्या कर्करोगाच्या वेदनाला संधिवात किंवा कामाचा ताण समजण्याची चूक करतात. हाडांच्या कर्करोगाचे प्रकार (Types Of Bone Cancer) - कोंड्रोसारकोमा - इविंग सरकोमा - ऑस्टियोसार्कोमा हाडांच्या कर्करोगाची लक्षणे - हाडांमध्ये वेदना - प्रभावित क्षेत्राभोवती सूज येणे - कमकुवत हाडे आणि सहजपणे तुटणे - अचानक वजन कमी होणे - थकवा हाडांच्या कर्करोगाच्या वेदना कधी सुरू होतात- हाडांच्या कर्करोगाचे दुखणे नेहमीच सुरू असते. पण काही कठीण काम ज्यामध्ये शारीरिक मेहनत जास्त असेल, तर हा त्रास वाढू शकतो. कठीण व्यायाम आणि जड वजन उचलल्यामुळे ही वेदना आणखी वाढू शकते. हाडांचा कर्करोग जसजसा वाढत जातो, तसतसे तुम्ही विश्रांती घेत असताना देखील त्यामुळे होणारे वेदना लक्षणीयरीत्या वाढू शकतात. हे वाचा -  गोड, रसाळ असलं तरी उन्हाळ्यात हे फळ भरपूर खा; वजन राहील नियंत्रणात हाडांच्या कर्करोगाची इतर लक्षणे - ताप - भरपूर घाम येणे - लालसरपणा आणि जळजळ - हाडावर किंवा आजूबाजूला गुठळ्या हे वाचा -  आता झोप पूर्ण होण्याचं टेन्शन विसरा; 4 तासांत घ्या 8 तासांची झोप; कशी ते वाचा डॉक्टरकडे कधी जायचे जेव्हा तुम्हाला एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कोणत्याही कारणाशिवाय हाडे आणि सांधेदुखीचा सामना करावा लागतो, तेव्हा तुम्ही डॉक्टरांना दाखवावे, तपासणी करून घ्यावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या