नवी दिल्ली, 13 जून : अधिक मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा (Skin Cancer) धोका वाढतो, असे एका नवीन अभ्यासा तून समोर आले आहे. यूएसमधील ब्राउन युनिव्हर्सिटीने केलेल्या NIH-AARP आहार आणि आरोग्य अभ्यासात (NIH-AARP Diet and Health Study) असे आढळून आले की, दररोज 42.8 ग्रॅम (म्हणजे आठवड्यातून सुमारे 300 ग्रॅम समतुल्य) माशांचे सेवन करणं त्रासदायक ठरू शकतं. यामुळे घातक मेलेनोमाचा धोका 22 टक्के जास्त होतो. 4,91,367 अमेरिकन प्रौढांच्या अभ्यासावर आधारित, शास्त्रज्ञांनी असे सुचवले की, जास्त मासे खाल्ल्याने त्वचेच्या बाहेरील थरात असामान्य पेशी विकसित होण्याचा धोका वाढतो, ज्याला स्टेज 0 मेलेनोमा किंवा मेलेनोमा इन सिटू (कधीकधी स्टेज 0) असेही म्हणतात. याला कर्करोगपूर्व प्रकार म्हणूनही ओळखले जाते. जो सर्वात सामान्य त्वचेच्या कर्करोगांपैकी एक आहे. माशांचे सेवन आणि मेलेनोमा जोखीम यांच्यातील संबंधांचे मूल्यमापन करणारे पूर्वीचे महामारीविज्ञान विषयक अभ्यास कमी माहितीचे किंवा विसंगत होते. काही अभ्यासांनी मेलेनोमाच्या वाढत्या जोखमीसह विविध प्रकारच्या माशांच्या सेवनाविषयी सांगितले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘कर्करोग कारणे आणि नियंत्रण’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. तज्ज्ञ काय म्हणतात - अमेरिकन हार्ट असोसिएशन निरोगी आहाराचा भाग म्हणून आठवड्यातून किमान दोनदा मासे खाण्याची शिफारस करते. या अभ्यासाचे लेखक Eunyoung Cho म्हणतात, “आमचा अंदाज आहे की आमच्या निष्कर्षांचे श्रेय माशांमधील दूषित घटकांना दिले जाऊ शकते, जसे की पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स, डायऑक्सिन, आर्सेनिक आणि पारा.” मासे खाणे योग्य नाही? फोर्टिस हॉस्पिटल बंगळुरूच्या मेडिकल ऑन्कोलॉजी आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. नीति रायजादा, IndianExpress.com मधील एका बातमीत म्हणतात, ‘मासे ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन डी आणि बी2 (रिबोफ्लेविन) सारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात. याशिवाय, माशांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस देखील भरपूर आहे आणि लोह, जस्त, आयोडीन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा देखील मोठा स्रोत आहेत. डॉ. रायजादा म्हणतात की सर्वसाधारणपणे, सर्व मेलेनोमाचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, सूर्यप्रकाशातील अतिनील (UV) किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्याने मेलेनोमा होण्याचा धोका वाढतो. हे वाचा - चिकनवर ताव मारणाऱ्यांना कोंबडीविषयी ‘ही’ गोष्ट नक्की माहीत नसणार माशांचे सेवन त्वचेच्या कर्करोगाशी कसे संबंधित आहे? डॉ. हितेश आर सिंघवी, सल्लागार हेड अँड नेक, फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड म्हणतात, “तळण्याच्या प्रक्रियेमुळे माशांमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स लक्षणीयरीत्या कमी होतात, जे त्याच्या पौष्टिक मूल्याचा प्राथमिक स्त्रोत आहे, अशा परिस्थितीत हे शक्य आहे. माशांच्या रोजच्या सेवनात इतके चांगले पौष्टिक मूल्य नसते. तथापि, हा डेटा अद्याप अनिर्णित आहे, कारण माशांचा प्रकार आणि स्वयंपाक पद्धती यासारखे घटक एकूण जोखीम घटकांवर प्रभाव टाकू शकतात. हे वाचा - Skin Care Tips: ‘हे’ घरगुती उपाय करा अन् चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मिळवा मुक्तता तज्ज्ञ असेही सुचवतात की, मासे खाणे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक यांनी स्पष्ट केले. “मला वाटत नाही की या अभ्यासाचे निष्कर्ष भारतीय आणि आशियाई लोकांच्या रंगद्रव्याच्या त्वचेवर लागू केले जाऊ शकतात. बरेच लोक, विशेषतः देशाच्या पूर्वेकडील भागात, बऱ्याच काळापासून मासे खातात. आम्ही आजपर्यंत माशांपासून मेलेनोमाचा जास्त धोका पाहिलेला नाही."