नवी दिल्ली, 25 मार्च : बोलताना किंवा कोणतंही काम करताना अनेक लोकांचे हात थरथरू लागतात (hands tremble), हे तुम्ही पाहिलं असेल. हा प्रकार ठराविक वयानंतर सर्वांनाच थोड्या-फार प्रमाणात होण्यास सुरुवात होते. मात्र, असं असलं तरी बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हा प्रकार तरुणांमध्येही दिसून येत आहे. मात्र, हात थरथरण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही न्यूरोलॉजिकल (मेंदू आणि चेतासंस्थेच्या नसांशी संबंधित) स्थितींमुळे हात थरथरू लागतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, हा प्रकार वृद्धांमध्ये पार्किन्सन आजारामुळं असू शकते. जाणून घेऊया कोणता व्यायाम करून हात थरथरण्याची त्रास कमी होऊ (hands tremble problem) शकतो. रबर बॉल व्यायाम रबर बॉलच्या व्यायामानं हाताचा थरकाप होण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. हा व्यायाम हातांची थरथरणे नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण, रबरी बॉल दाबल्यानं हातांच्या नसा दाबल्या जातात. चेंडू शक्य तितका घट्ट पकडा आणि तो पिळण्याचा प्रयत्न करा. यामुळं तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. हे वाचा - स्वयंपाक करताना कोणत्या धातूची भांडी वापरावीत? अनेकांची यात गफलत होते हाताचा डंबेल व्यायाम हाताच्या डंबेलचा व्यायामही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या व्यायामामुळं हाताचं थरथरणं कमी होतं. हा व्यायाम पार्किन्सन्सच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. कारण त्यामुळं थकवा आणि मज्जातंतूंचा ताण दूर होण्यास मदत होते. हे वाचा - दूध पिण्याच्याबाबतीत अशी चूक बरेचजण करतात; या वेळात प्यायल्यानं अनेक त्रास होतात फिंगर टॅप एक्सरसाईजही उपयुक्त फिंगर टॅप एक्सरसाईजमुळं हातांच्या थरथरण्यापासून आराम मिळेल. या व्यायामामध्ये तुम्हाला तुमच्या बोटांच्या आणि हातांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावं लागेल. फिंगर टॅप व्यायाम हा एक साधा व्यायाम आहे, जो तुमचे हात गुंतवून ठेवेल आणि गती नियंत्रणावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, सूरपेटी (वाद्य), पियानो, गिटार वाजवण्याचाही चांगला उपयोग होऊ शकतो. यामुळं वाद्य वाजवण्याचा आनंद मिळण्यासह हातांची थरथर कमी होण्यासही मदत होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)