JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डिलिव्हरीनंतर चेहऱ्यावर काळे डाग आलेत? चिंता सोडा, करा एक्स्पर्स्टसने सांगितलेले हे उपाय

डिलिव्हरीनंतर चेहऱ्यावर काळे डाग आलेत? चिंता सोडा, करा एक्स्पर्स्टसने सांगितलेले हे उपाय

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोन्सची वाढ आणि उत्पादन होत असते. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडू शकतात. हे डाग तुम्ही काही घरगुती उपाय करून घालवू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. डिलिव्हरीनंतर त्वचा पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. या काळात अनेक महिलांच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात आणि ही सामान्य समस्या आहे. कारण गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात हार्मोन्सची वाढ आणि उत्पादन होत असते. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडू शकतात. प्रेग्नन्सी च्या नऊ महिन्यांत उद्भवलेल्या अनेक समस्या प्रसूतीनंतर निघून जातात. परंतु प्रसूतीनंतरही तुम्हाला त्वचेशी संबंधीत समस्या कायम असतील तर हा लेख तुमच्यासाठी खुप उपयोगी ठरू शकतो. या लेखात आम्ही तुम्हाला प्रेग्नन्सी नंतर चेहऱ्यावर पडलेले काळे डाग कसे दूर करावे याबाबात सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला तज्ञांनी सुचवलेल्या काही पदार्थांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करावा लागेल आणि काही उपाय करावे लागतील. यासाठी माता आणि बाल पोषणतज्ञ डॉ. रमिता कौर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून काही उपाय सुचवले आहेत. तसेच आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही तुम्हाच्या आहारत या पदार्थांचा समावेश केला आणि त्यांनी सुचवलेले उपाय केल्यास तुम्ही पुन्हा पूर्वीप्रमाणे सुंदर दिसू शकता.

वाढत्या वयातही दिसा आणि रहा तरुणच; हे आहेत सोपे आणि प्रभावी फिटनेस फंडे

काळे डाग दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय हर्बल पॅक - मुलतानी माती घ्या आणि त्यात गुलाबजल मिसळा. याची चांगली पेस्ट बनवा आणि ती प्रभावित भागावर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.

कोरफडीची पेस्ट - कोरफड म्हणजेच एलोवेरा जेल घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि प्रभावित भागावर 5 ते 6 मिनिटे लावा. बटाट्याच्या सालीची जादू - किसलेला बटाटा घ्या आणि त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. यानंतर हे मिश्रणन 10 मिनिटे प्रभावित भागावर मसाज करून लावा आणि नतंर चेहरा स्वच्छ धुवा. प्रोबायोटिक पॅक - अर्छा चमचा टोमॅटोचा रस घ्या आणि 1 चमचा दही घ्या. हे दोन्ही घटक चांगले मिसळा. त्यानंतर चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे तसेच ठेवा. ओमेगा पॅक - हा पॅक बनवण्यासाठी अक्रोड, सफरचंद आणि मध घेऊन त्यांची व्यवस्थित पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट प्रभावित भागावर लागू करा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा. ऑरेंज रोझ पॅक - हा पॅक बनवण्यासाठी संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये कच्चे दूध घालून चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट प्रभावित भागावर 15 ते 20 मिनिटे लागू करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. बालपणापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, प्रत्येक टप्प्यात कसा असावा महिलांचा आहार आहारात या पदार्थांचा करा समावेश त्वचेच्या समस्यांशी लढण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात रताळे, लिंबू, भोपळा, बेरी, फॅटी फिश आणि शेंगा हे काही उत्तम पदार्थ आहेत. याशिवाय तुम्ही चमकदार रंगाच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, नट्स आणि सीड्स, रताळे, एवोकॅडो लिंबू, किवी आणि इतर लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकता. यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्यांवर मात करण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या