पावसात सर्दी आणि फ्लू झाल्यास दलिया, खिचडी आणि फळे 4-5 दिवस खावीत. यामुळे तुम्हाला त्रासातून आराम मिळेल. फळांचा रस देखील या ऋतूत शरीरासाठी फायदेशीर ठरतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
नवी दिल्ली, 5 जुलै : निरोगी जीवनासाठी व्यायाम, संतुलित आहार आणि तणावमुक्त राहणं अत्यंत आवश्यक असतं. दैनंदिन पौष्टिक आहार (Nutritious diet) घेताना त्यात फळांचा समावेश असायला हवा असं डॉक्टर तसंच आहारतज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जातं. प्रत्येक हंगामात येणाऱ्या फळांचं सेवन केलं तर शरीराला त्याचा चांगला फायदाही होतो. सोशल मीडियावरही पौष्टिक आहाराबद्दल अनेक पोस्ट पाहायला मिळतात. परंतु, खाणपिण्याबद्दल चुकीचं मार्गदर्शन अनेकवेळा प्रकृतीसाठी अपायकारकही ठरू शकतं. काही वेळा आहारातील चुकीच्या अन्न संयोजनाचा (Food Combinations) फटका बसू शकतो. त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकतं. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. दररोजच्या पदार्थांचा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे काहीतरी नवीन करून बघावं म्हणून पपई आणि लिंबाचं (Papaya and Lemon) एकत्र सेवन केलं जातं. परंतु, हे कॉम्बिनेशन घातक ठरू शकतं. पपई आणि लिंबू एकत्र घेतल्यास पोटात त्याचं विष तयार होऊ शकतं. जुलाबसारखी समस्या यातून निर्माण होण्याची दाट शक्यता असते. कलिंगड आणि पाणी एकत्र घेणं अपायकारक तसं पाहिले तर पाणी आणि कलिंगड एकमेकांना पूरक आहेत; पण कलिंगड खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये (Watermelon and water), असा सल्ला दिला जातो. यामुळे कॉलरासारखा आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे याचं सेवन केल्यास फायदा मिळू शकतो; पण कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. पेरू आणि केळी एकत्र नका खाऊ अनेकदा विविध फळं एकत्र करून खाण्याची बरेच जणांना सवय असते; पण असं करत असताना पेरू व केळी यांचं एकत्रित सेवन न करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. या दोन्हींचं एकत्रित सेवन केलं तर उलटी, मळमळ व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. काही अंतराने ही फळे खाल्ल्यास त्याचा त्रास होणार नाही. अननस आणि दूध ठरू शकतं धोकादायक आहारामध्ये विविध प्रकारचे मिल्क शेक (Milk Shake) घेण्याचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. यात अनेकजण आंबा, केळी व इतर फळांचा शेक घेण्यास प्राधान्य देतात. परंतु, काही फळांसोबत दूध एकत्र करून त्याचं सेवन करणं शरीराला धोकादायक ठरू शकतं. जसं की, अननस व दूध एकत्र (Pineapple Shake) घेत असाल तर ती सवय बंद करायला हवी, असं आहारतज्ज्ञ सांगत असतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर आहारासंबंधी टिप्स देणारे अनेक व्हिडिओ, पोस्ट दररोज पाहायला मिळतात. दाखवल्या जाणाऱ्या बाबींवर विश्वास ठेऊन त्याचं अनुकरण केलं जातं आणि आरोग्याला फायदा होण्याऐवजी त्याचे नुकसानच अधिक होते. त्यामुळे कुठलंही फूड कॉम्बिनेशन खाण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही चांगलं.