मुंबई, 15 ऑक्टोबर : हिंदू घरांमध्ये पूजा कक्ष हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. प्रत्येकजण देवाला प्रार्थनेसाठी दररोज सकाळी घरातील पूजेचं ठिकाण स्वच्छ करतो आणि सजवतो आणि दिवाळी च्या काळात तर देवघर असो की देवासाठी वापरली जाणारी भांडी ही विशेष वापरली जातात. त्यामुळे स्वच्छ कारण हे दिवाळीपूर्वीचं एक महत्वाचं काम असतं. आता बहुतेक लोक आठवडाभर कामत असतात. अशावेळी सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजे विकेंडला ही भांडी साफ करणं सोपं राहील. दिवाळीपूर्वी सुट्टीतच हे काम आटोपून जाईल. बहुतेक ठिकाणी प्रार्थनेच्या वेळी वापरण्यात येणारे दिवे, घंटा आणि पूजेची भांडी पितळाची असतात. ही भांडी दररोज वापरली जातात, त्यामुळे तेलकट आणि काळी होतात. त्यामुळे देवघराची जागा पवित्र आणि स्वच्छ ठेवणे सोपे काम नाही. ही काळी झालेली भांडी स्वच्छ करणे सोपे काम नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु आज आम्ही तुम्हाला येथे अशा काही टिप्स सांगत आहोत, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या देवघरातील पितळी भांड्यांची चमक कायम ठेवू शकता.
Diwali 2022 : दिवाळीपूर्वी या वस्तू काढा घराबाहेर, घाणीसोबत अनेक आजारही जातील घरापासून दूरपितळी भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरा हे पर्याय लिंबू आणि बेकिंग सोडा : लिंबू आणि बेकिंग सोडा तुम्हाला पितळी भांडी स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी एक चमचा बेकिंग सोड्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि पेस्ट होईपर्यंत ढवळा. त्यानंतर ही पेस्ट वापरून मऊ कापडाने पितळी भांडी घासून घ्या. भांडी किंवा इतर कोणत्याही पितळेच्या वस्तूंवर कठीण डाग असेल तर ते सुमारे 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने भांडी स्वच्छ धुवा आणि कोरडे करा.
लिंबू आणि मीठ : लिंबू आणि मीठ यांचं मिश्रण करून तुम्ही तुमची पितळी भांडी स्वच्छ करू शकता. हा देखील एक प्रभावी पर्याय आहे. यासाठी एक लिंबू अर्धा कापून घ्या आणि ते एक चमचा मीठात पिळून घ्या. त्यानंतर या पाण्याने डाग पडलेली पितळी भांडी घासा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून कोरडे होऊ द्या. तुम्हाला अपेक्षित चमक मिळवण्यासाठी हा पर्याय दररोज वापरा. पीठ, मीठ आणि व्हाईट व्हिनेगर : पीठ, मीठ आणि व्हाईट व्हिनेगरच्या मदतीने देखील तुम्ही तुमची भांडी चमकवू शकता. यासाठी हे तिन्ही गटक समान प्रमाणात घ्या आणि एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट पितळी भांड्यावर लावा आणि 30 ते 40 मिनिटे तशीच राहू द्या. यानंतर भांडी कोमट पाण्याने धुवा.
Diwali Cleaning Tips : ग्रीन दिवाळीची साफसफाईपासूनच करा सुरुवात; अशी करा घराची इकोफ्रेंडली स्वच्छताटोमॅटो सॉस किंवा टोमॅटो पेस्ट : टोमॅटोमध्ये आम्ल तत्त्व असते, जे पितळ आणि इतर धातूंवरील डाग काढून टाकण्यास मदत करते. यासाठी टोमॅटो केचप, टोमॅटो पेस्ट आणि टोमॅटो सॉस चांगले परिणामकारक आहे. पितळी भांड्यांवर याचा एक थर लावा आणि तासभर तसेच राहू द्या. त्यानंतर भांडी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरडे होऊ द्या.