मुंबई, 18 ऑक्टोबर : दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे लोक दिवाळीच्या तयारीत पूर्ण उत्साहात व्यस्त आहेत. घराची स्वच्छता आणि सजावट करण्यात लोक कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. असे मानले जाते की दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. अशा स्थितीत घराचा दरवाजा स्वच्छ आणि सुशोभित असणं आवश्यक आहे. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी घरात प्रवेश करू इच्छित असल्यास, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही शुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी नक्की असाव्या. दारावर रांगोळी, स्वस्तिक, पणती आणि त्यासोबत एक महत्वाची वस्तू म्हणजेच तोरण असावे. तोरण ही दिवाळीसारख्या सणाला लावणे अतिशय शुभ मानले जाते. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी तोरण कसे बनवायचे हे सांगणार आहोत. काही व्हिडिओ तुम्हाला तोरण बनवण्यास मदत करतील.
Diwali 2022 : दिवाळीला कमी खर्चात घराची करा सुंदर सजावट, या आहेत काही सोप्या डेकोरेशन आयडिया- वूलनचे साधे तोरण बनवण्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली ही पद्धत वापरू शकता. यासाठी तुम्हाला हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे वूलन, दोन खिळे, थर्माकोल किंवा लाकडाचा लाम्बासार तुकडा आणि कैची लागेल.
- या प्रकारचे वूलनचे तोरण बनवण्यासाठी तुम्हाला गुलाबी, पिवळा रंगाचे वूलन, कार्डबोर्ड पेपर आणि थोड्या सजावटीच्या वस्तू लागतील. हे तोरण खूप सोपे आहे आणि तितकेच सुंदरही दिसते.
- वूलनचे हे तोरण बनवण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे वूलन, कैची आणि काही मणी लागतील. अशाप्रकारचे तोरण तुमच्या दाराला एक फ्रेश आणि सुंदर लूक देतील. पाहणारे पाहताच राहतील.
- हे तोरण रंगीबेरंगी आणि खूप अक्षरश दिसते. यासाठी तुम्हाला पिवळा, हिरवा आणि लाल रंगाचे वूलन, कैची आणि सजावटीसाठी काही मणी आणि इतर गोष्टी लागतील. हे तोरण दिवाळीला तुमच्या दाराची शोभा नक्कीच वाढवेल.
- दारावरची तोरण तर पहिले आता एक तोरण देवघराची. जिथे आपण लक्ष्मी मातेची स्थापन करणार आहोत त्या देवघराला लावण्यासाठी तुम्ही केवळ मोत्यांचे तोरण बनवू शकता. हे अतिशय सुंदर लूक देते आणि खूप रिच दिसते. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे मणी, मोती, सुई दोरा आणि कैची लागेल.
अशाप्रकारचे कोणतेही तोरण तुम्ही यंदाच्या दिवाळीला बनवून दारावर लावू शकता. याने तुमचे प्रवेशद्वार सुंदरही दिसेल आणि लक्ष्मी माता आनंदाने तुमच्या घरात प्रवेश करेल.