मुंबई, 22 ऑक्टोबर :
दिवाळी
म्हंटलं की महाराष्ट्रात एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. बाजारपेठेमध्ये ग्राहकांची रेलचेल पाहायला मिळते. तसेच महाराष्ट्राचा मुख्य पोशाख म्हणजे नऊवारी साडी आणि याच साडीवर घातली जाणारी महत्वाची आभूषण म्हणजे नथ आणि ठुशी. दिवाळीनिमित्त बाजारात अनेक ठिकाणी पारंपरिक दागिने मिळतात. दादर येथील एका दुकानात 50 प्रकारच्या नथ आणि 30 प्रकारच्या ठुशी उपलब्ध आहेत. हे प्रकार उपलब्ध महाराष्ट्रीयन नथींमध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध अनेक प्रकार आहेत. नथीमुळे स्त्री च्या सौंदर्यांमध्ये अधिकच भर पडते. नथीचे अनेक प्रकार या दुकानात उपलब्ध उपलब्ध आहेत. तसेच ठुशी चोकर प्रकारात आणि त्या सोबत घातली जाणारी थोडी लांब ठुशी निरनिराळ्या डिझाईन मध्ये इथे मिळते. बाजीराव मस्तानी नथ आणि ठुशी इथे खरेदी करता येते. कोणत्या प्रकाराला जास्त मागणी? नथ आणि ठुशी यांचा ट्रेंड सिरीयल, चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या दागिन्यानुसार बदलतो पण नथ मध्ये असलेला मोती मात्र कुठेही लपत नाही. तसेच मराठी दागिन्यामध्ये डाळिंबी आणि हिरव्या रंगाचा डायमंड असलेल्या दागिन्याला जास्त पसंती आहे. सहसा नथ आणि ठुशी एकत्र घेतली जाते. पारंपारिक नथीचा व ठुशीचा ट्रेंड आहे. तसेच कारवारी आणि बानू नथीचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
Diwali 2022 : दिवाळीनिमित्त दागिन्यांवर 50 टक्के सूट, पाहा Video
सण उत्सव आले की मराठी महिला सोनेरी दागिन्यांना पसंती देतात.तसेच दागिन्यांमध्ये वेगळेपण सुद्धा हवं असतं त्यामुळे आम्ही यावर्षी दिवाळीनिमित्त 50 प्रकारच्या नथ आणि 30 प्रकारच्या ठुशी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तसंच विशेष दागिन्यांवर ऑफर सुद्धा दिली आहे. एकावर एक मोफत अशी ऑफर आहे. यात ज्या किमतीची वस्तू घेतली त्याच किमतीची वस्तू मोफत मिळणार आहेत, अशी माहिती या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं दिली.
गुगल मॅपवरून साभार
कुठे मिळणार हे सर्व प्रकार? दादर रेल्वेस्थानकाच्या पश्चिम दिशेला बाहेर आल्यावर नूतन कलेक्शनमध्ये नथ आणि ठुशीचे हे सर्व प्रकार उपलब्ध आहेत. संपर्क क्रमांक - 9819610682