JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diabetes And Peanut : डायबिटीजच्या रुग्णांनी शेंगदाणे खावे का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

Diabetes And Peanut : डायबिटीजच्या रुग्णांनी शेंगदाणे खावे का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे का? हा प्रश्न या आजाराने त्रस्त लोकांच्या मनात फिरतो. आज आम्ही तुम्हाला त्याचे सत्य सांगणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जानेवारी : हिवाळ्यात शेंगदाणे खायला सर्वांनाच आवडते. शेंगदाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याच कारणामुळे लोक हिवाळ्यात भरपूर शेंगदाणे खातात. आता प्रश्न पडतो की, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलचे रुग्ण शेंगदाणे खाऊ शकतात का? खरं तर अशा रुग्णांनी त्यांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी काही गोष्टींचे सेवन केल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर शेंगदाणे खाल्ल्याने काय परिणाम होतो ते सांगणार आहोत. याचे शरीराला काय फायदे होतात हे देखील सांगणार आहे.

गाईच्या दुधाचे की म्हशीच्या दुधाचे तूप आहे जास्त फायदेशीर, पाहा दोन्हीतील फरक

संबंधित बातम्या

जाणून घ्या शेंगदाणे खाण्याचे फायदे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते पीनट इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार, शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट, फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आढळतात. शेंगदाण्यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि निरोगी तेले असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करतात.

मधुमेहाचा धोका कमी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेहाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार, दररोज शेंगदाणे खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 7 ते 21% कमी होतो. उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो शेंगदाण्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखे खनिजे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी रोज शेंगदाणे खाल्ल्यास रक्तदाब बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. शेंगदाणे खाल्ल्याने अशा रुग्णांना नुकसान होण्याची शक्यता कमी असते. मधुमेहाच्या रुग्णांनी मध खाल्ला तर चालेल का? कसा होतो हेल्थवर परिणाम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते हार्वर्डच्या संशोधकांनी एका अभ्यासात उघड केले आहे की, जे लोक दररोज शेंगदाणे खातात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 13% कमी होतो. शेंगदाणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळते. कोलेस्ट्रॉल आणि धमनीच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी देखील शेंगदाणे प्रभावी आहेत. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या