चंदीगड, 29 जानेवारी : सून (daughter in law) लक्ष्मीच्या पावलांनी सासरी येते असं म्हणतात. पश्चिम बंगालमधील एका कुटुंबासाठी ती खऱ्या अर्थानं लक्ष्मी ठरली आहे. तिच्या सासऱ्यांना (father in law) इतकी वर्षे जे शक्य झालं नाही ते त्यांच्या सुनेनं एका क्षणात केलं. सुनेच्या एका निर्णयामुळे सासऱ्याचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. आसननोलची रहिवाशी असलेली 48 वर्षांची संगीता चौबे. लहान मुलांना चित्रकला आणि मातीच्या वस्तू बनवायला शिकवते. तिचे सासरे कित्येक वर्षे आपलं नशीब आजमावत होते. लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. पण त्यांचं नशीब काही त्यांना साथ देत नव्हतं. इतकी वर्षे लॉटरीचं तिकीट खरेदी करूनही त्यांना लॉटरी लागली नाही. अखेर आपल्या सुनेच्या हातानं तरी आपलं नशीब चमकतं हे त्यांनी पाहिलं. त्यांनी यावेळी सुनेला लॉटरी काढायला सांगितली आणि काय चमत्कार खरंच त्यांची सून त्यांच्यासाठी लक्ष्मी घेऊन आली. सुनेनं लॉटरीचं तिकीट काढताच त्यांना ती लॉटरी लागली. **हे वाचा -** OMG! सोनं-चांदी, पैसे नाही तर 21 विषारी साप; मुलीला दिला जातो विचित्र हुंडा संगीता म्हणाली, “माझे सासरे खूप आधीपासून लॉटरी काढत होते पण त्यांना कधीच इतका मोठा पुरस्कार जिंकला नाही. अखेर त्यांचं भाग्य उजळलं त्यांनी पहिला पुरस्कार जिंकला. आपण आपल्या आयुष्यात इतके पैसे स्वप्नातही पाहिले नाही. पण नववर्षाच्या लोहडी बंपरनं ते खरं केलं” पंजाबमध्ये दरवर्षी मकर संक्रांतीला न्यू इअर लोहडी बंपर लॉटरी निघते. यंदा हे लॉटरीचं तिकिट 500 रुपये होतं. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या लॉटरीची विक्री होते. पंजाबच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लॉटरी मिळते. ऑनलाइनही विक्री होते. आता होळी आणि बैसाखीलाही लॉटरी काढली जाईल.