JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / CoronaVirus फ्रिजमध्येही जिवंत राहू शकतो का?

CoronaVirus फ्रिजमध्येही जिवंत राहू शकतो का?

Coronavirus शी मिळताजुळता असलेला सार्स व्हायरस फ्रिजमध्ये (fridge) 28 दिवस जिवंत राहत असल्याचं एका संशोधनात दिसून आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक जण जीवनावश्यक सामानांची अधिकची खरेदी केली आहे. लवकर खराब होणा-या वस्तूंसाठी फ्रिज (fridge) उपयोगी ठरत आहे. मात्र जर तुम्ही योग्य खबरदारी घेतली नाही तरी फ्रिजमुळे तुम्हाला कोरोनाव्हायरसचा धोका आहे. Coronavirus शी मिळताजुळता असलेला सार्स व्हायरस फ्रिजमध्ये 28 दिवस जिवंत राहत असल्याचं एका संशोधनात दिसून आलं. अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजीने (American Society for Microbiology) 2010 साली सार्स व्हायरसवर केलेल्या संशोधन केलं होतं, या संशोधनानुसार, डीप फ्रिजरमध्ये हा व्हायरस 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. या अभ्यासात दिसून आलं की, 40°F पेक्षा कमी तापमान आणि आद्रतेत कोरोनाव्हायरस तग धरतो, हेच तापमान आपण वापरत असलेल्या फ्रिजचं असतं. याच संशोधनाच्या आधारावर अमेरिकेच्या ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटने सूचना जारी केली आहे. कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटचे डॉ. वॉर्नर ग्रीन म्हणाले, “डिप फ्रिजर स्वच्छ ठेवा. त्यात तुम्ही जे सामान ठेवणार ते साफ करून घ्या आणि स्वत:चीही स्वच्छता राखा.” कशी काळजी घ्याल? -सामानाची डिलीव्हरी थेट घेऊ नका. एका सुरक्षित ठिकाणी सामान ठेवून नीट स्वच्छ करून आत घ्या. -त्यानंतर हात साबणाने नीट धुवा. -फ्रिजमध्ये जे सामान ठेवणार आहात, ते नीट स्वच्छ करा. -फ्रिजही नियमित स्वच्छ करा. यासाठी तुम्ही ब्लीचाही वापर करू शकता. Covid-19 पासून बचावासाठी लोकांनी वापरलेल्या या जगावेगळ्या मास्कच्या तऱ्हा! संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या