JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / GOOD NEWS! लसीकरणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार CORONA VACCINE

GOOD NEWS! लसीकरणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना मिळणार CORONA VACCINE

आतापर्यंत 45 पेक्षा जास्त वयाच्या पण इतर आजार असलेल्या व्यक्तींनाच कोरोना लस (Corona vaccine available for above 45 years age person) दिली जात होती.

जाहिरात

corona vaccine

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 मार्च : भारतात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccination in India) वेग आला आहेत. आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार (Corona Vaccine available for above 45 years aged person) आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून हे लसीकरण सुरू केलं जाणार आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र असलेल्यांनी आपली नोंदणी करावी, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. आतापर्यंत वयस्कर व्यक्ती आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार होते त्यांनाच कोरोना लस दिली जात होती. पण आता आजार नसलेल्या व्यक्तींनाही कोरोना लस दिली जाणार आहे. लसीकरणाबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारने 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या

काही राज्यांमध्ये कोरोनाचा यूकेतील नवा स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन सर्वात जास्त तरुणांमध्येच दिसून आला आहे. त्यामुळे तरुणांचंही लसीकरण करावं, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कील आहे. हे वाचा -  भारताने लसीकरणाचं धोरण बदलण्याची गरज?वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आलं.  लसीकरणाचा आज 66 वा दिवस आहे.  केंद्र सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात  4.8 कोटी (4,84,94,594) लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी 78,59,579 आरोग्य कर्मचारी आणि 82,42,127 फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला तर 49,59,964 आरोग्य कर्मचारी आणि 29,03,477 फ्रंटलाइन वर्कर्सना लशीचा दुसरा डोस मिळाला आहे. 45 ते 60 वयोगटातील इतर आजार असलेल्या 42,98,310 नागरिकांनी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन कोटींपेक्षा जास्त वयस्कर व्यक्तींनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या