JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / BREAKING: भारताला मोठं यश; पहिली स्वदेशी लस COVAXIN ला मिळाली मंजुरी

BREAKING: भारताला मोठं यश; पहिली स्वदेशी लस COVAXIN ला मिळाली मंजुरी

COVAXIN ही भारताची कोरोना लस (Corona vaccine) यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाव्हायरसविरोधातही प्रभावी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 जानेवारी : भारतासाठी सर्वात मोठी बातमी आहे. कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (emergency use) मंजुरी मिळाली आहे. मेड इन इंडिया कोरोना लस COVAXIN  ला परवानगी देण्यात आली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे जिच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकनं (bjarat biotech) तयार केलेली ही लस.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं  (Central Drugs Standards Control Organisation) च्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. या समितीनं आता DCGI कडे शिफारस केली आहे. आता DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या

भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 ही लस. ही लस यूकेत (UK) आढळलेल्या  नव्या कोरोनाव्हायरसविरोधातही प्रभावी आहे, अशी माहिती याआधीच कंपनीनं दिली आहे. त्यामुळे या लशीला मंजुरी म्हणजे नव्या कोरोनाव्हायरसलाही टक्कर देण्याच्या दिशेनं सरकारनं उचललं सर्वात मोठं पाऊल आहे. हे वाचा -  तुम्हालाही Corona vaccine हवी का? कशी करावी नोंदणी पाहा एका क्लिकवर सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं जारी केला होता. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम  medRxiv  वर प्रसिद्ध करण्यात आला होता. हे वाचा -   सूचना मिळताच 24 तासांत सुरू होणार लसीकरण; मुंबईत कोरोना लशीसाठी अशी झाली तयारी भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणारी ही दुसरी कोरोना लस आहे. 1 जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड (Covishield) लशीलाही परवानगी देण्यात आली. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनी यांच्यासह सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली ही लस आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या