JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! कोरोनापासून तुमचं संरक्षण करणा-या मास्कवर तब्बल आठवडाभर असतो व्हायरस

बापरे! कोरोनापासून तुमचं संरक्षण करणा-या मास्कवर तब्बल आठवडाभर असतो व्हायरस

कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) पासून बचावासाठी एकच (Mask) वापरू नका.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी सर्वजण मास्क (mask) वापरत आहेत. काही जण तर एकच मास्क वारंवार वापरत आहेत. मात्र असं करणं चांगलंच महागात पडेल. कारण सर्वसामान्यपणे वापरल्या जाणा-या सर्जिकल मास्कवर कोरोनाव्हायरस तब्बल एक आठवडा जिवंत राहतो असं एका संशोधनात दिसून आलं आहे. University of hongkong (HKU) च्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त दिलं आहे. संशोधकांनी कोरोनाव्हायरस रूम टेम्प्रेचरवर वेगवेगळ्या ठिकाणी किती वेळ राहतो तपासलं. -प्रिंटिंग आणि टिश्यू पेपर - 3 तासांपेक्षा कमी वेळ राहतो. -लाकूड आणि कपडे - दुस-या दिवशी नाहिसा होतो. -काच आणि नोटा - चौथ्या दिवशी नष्ट होतो. -स्टील आणि प्लास्टिक - 4 ते 7 दिवस आश्चर्य म्हणजे सर्जिकल फेस मास्कवर हा व्हायरस तब्बल आठवडाभर राहू शकतो. 7 दिवसांनंतरही मास्कच्या बाह्यभागवर व्हायरस असल्याचं दिसून आलं. संशोधक मलिक परिस म्हणाले, “मास्कच्या बाह्यभागावर व्हायरस इतके दिवस राहू शकतो. त्यामुळेच व्हायरसच्या बाह्यभागला चुकूनही स्पर्श करू नये. नाहीतर हे व्हायरस तुमच्या हातांवर जातील आणि जर असे हात तुम्ही डोळ्यांना लावलात तर डोळ्यांच्या माध्यमातून हे व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करतील” त्यामुळे मास्क लावण्यासह हात स्वच्छ धुणे हा व्हायरसपासून बचावाचा मार्ग आहे. “कोरोनापासून वाचण्यासाठी हात धुण्याला प्राधान्य द्यावं. स्वच्छता राखा, हात नीट धुवा. हात धुण्याआधी चेह-याला कुठेही स्पर्श करू नका”, असा सल्ला संशोधक लियो पून लिटमन यांनी दिला आहे. त्यामुळे मास्क वापरताना हलगर्जीपणा करू नका. आवश्यक ती सर्व काळजी घ्या. 90 वर्षीय आई-बापाला मुलांनी सोडलं वाऱ्यावर, पोलीस अधिकारी झाला श्रावण बाळ कोरोनासारख्या गंभीर संकटातही कुटुंबातील व्यक्तीला अखेरचा निरोप देताना घडली चूक संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या